धरणगाव प्रतिनिधी
धरणगाव :- शहरालगत चोपडा रोडवरील शगुन कोटेक्स प्रा.लि. नावाच्या कापूस जिनिंगमध्ये अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत तब्बल ७२ हजाराच्या गठाणी लंपास केल्या आहेत.या संदर्भात अधिक असे की, धरणगाव-चोपडा रोडवरील पिंपळे शिवारातील शगुन कोटेक्स प्रा.लि. नावाच्या कापूस जिनिंगचे तार कंपाऊंड तोडून अज्ञात चोरट्यांनी ७२ हजार किंमतीच्या एकूण ८ गठाणी चोरून नेल्याची घटना १८ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ ते १८ फेब्रुवारीच्या सकाळी ७ वाजेच्या दरम्यान घडली. याबाबत शगुन जिनिंगचे संचालक किरण दयाराम पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार करीम सैय्यद हे करीत आहे.