2 दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवत,व बँक व्यवस्थापकावर शस्त्राने वार करून सुमारे 15 लाखांची रोकड लंपास. जळगाव :- शहरातील कालींका माता मंदिर परिसरामधील स्टेट बँकेच्या शाखेत हा दरोडा टाकला आहे.धारदार शस्त्राने बँक व्यवस्थापक राहुल महाजन यांना जखमी करून शस्त्राच्या बळावर भरदिवसा हा दरोडा टाकून अंदाजे 15 लाखांपेक्षा अधिक रूपयांची रोकड व दागिने घेऊन दरोडेखोर पसार झाले आहे. या घटनेने जळगाव शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे घटना?
जळवात शहरातील कालींका माता मंदिर परिसरातील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाच्या जवळ स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा असून आज बँक उघडून नियमीतपणे कारभार सुरू झाल्यानंतर सकाळी साडेनऊच्या सुमारास दोन युवक दुचाकीवरून बँकेत आले.
त्यांच्याकडे कोयत्यासारखे धारदार शस्त्र होते. या शस्त्राच्या बळावर त्यांनी धारदार शस्त्राने बँक व्यवस्थापक राहुल महाजन यांना जखमी करून पाच-सहा कर्मचार्यांना धमकावले. याप्रसंगी दरोडेखोरांनी बँकेच्या व्यवस्थापकाच्या मांडीवर कोयत्याने वार करून बँकेतील रोकड व दागिने घेऊन दरोडेखोरांनी पलायन केलं.
दरम्यान, दरोडेखोरांनी बँकेतील सुमारे 15 लाख रुपयांपेक्षा अधिकची रोकड व दागिने लांबविल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या ठिकाणी एस.पी. एम. राजकुमार, अपय अधिक्षक चंद्रकांत गवळी, एमआयडीचीचे प्रभारी शंकर शेळके आदींनी सहकार्यांसह भेट दिली असून श्वास पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. भर दिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
https://www.youtube.com/@zunjaarnews
☝️☝️ वर दिलेल्या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ????????????
Like share and Subscribe our youtube Channel
- Viral Video: दोन दरोडेखोर पिस्तुलाचा धाक दाखवून दागिने लुटणार इतक्यात दुकानदार व कर्मचाऱ्यांनी अस केलं की चोरांचा डाव उलटवला.
- पोलखोल! बनावट एडिशनल एसपी बनून आली पोलीस ठाण्यात पोलिसांनी केलं सॅल्यूट;पण एक छोटीशी चूक होताच पोलिसांनी केला महिलेचा पर्दाफाश.
- एरंडोल येथे संविधान दिवस उत्साहात संपन्न; “घर घर संविधान” चळवळ यशस्वी करण्याचा संकल्प
- धक्कादायक! आईने घरातील पत्र्याला घेतला गळफास,तर दोन चिमुकली आढळली पाण्याच्या बॅरेलमध्ये,कारण अस्पष्ट.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४