धरणगाव प्रतिनिधी योगेश पाटील
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
धरणगाव प्रतिनिधी (योगेश पाटील):- धरणगाव शहराला काळिमा लावणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ आज भव्य जण आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यात शहरातील प्रत्येक नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते यात दुमत नाही परंतु शहरातील तमाम माता भगिनींचा सहभाग हा जन आक्रोश मोर्चा चा मुख्य मुद्दा ठरला यावरून असे स्पष्ट होते की शहरातील महिला वर्गामध्ये प्रचंड प्रमाणात चीड निर्माण झालेली असून त्या नराधमास लवकरात लवकर प्रशासनाने त्याची केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालून लवकरात लवकर त्यास फाशीची शिक्षा देण्यात यावी या निर्णयावर तमाम माता भगिनींचे एकमत होते.
या प्रसंगी शिवसेनेच्या माजी नगराध्यक्षा सौ.उषाताई वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मा.नगराध्यक्षा सौ.पुष्पाताई महाजन, सौ.नजीम शेख मॅडम, लिटल ब्लॉसम स्कूल च्या संचालिका सौ.ज्योती जाधव, सौ.प्रा.कविता महाजन यांनी आपले निषेधपर मनोगत व्यक्तकरित येणाऱ्या संकटांना व घटनांना महिला मुलींनी कश्या प्रकारे तोंड द्यावे ह्याचे मार्गदर्शन करीत त्या नाराधमास प्रशासनाने लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्ट चालवून फाशी शिक्षा देण्यात यावी अशी सर्वानुमते मागणी करण्यात आली.
पीडित कुटुंबाला सावरण्यासाठी एक छोटीशी मदत…!
प्रसंगी लिटिल ब्लॉसम स्कूल तर्फे पीडित मुलीला पुढील शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करीत पुढील इंग्रजी शिक्षण मोफत देण्यात येणार आहे तसेच धरणगाव शिवसेना परिवारातर्फे रुपये 21 हजारांची मदत तात्काळ देण्यात येत आहे असे प्रतिपादन मा.गुलाबरावजी वाघ शिवसेना सहसंपर्कप्रमुख जळगाव लोकसभा यांनी केले. त्याच प्रमाणे शहरातील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे सचिव डॉ. मिलिंदजी डहाळे यांनी पीडित मुलींना पुढील महाविद्यालयीन शिक्षण मोफत करून लागेल ती मदत करू असे आश्वासन देत पीडित कुटुंबास सावरण्याच्या एक छोटासा प्रयत्न करण्यात आला. तसेच इतरही सामाजिक संस्था व व्यक्तिगत स्वरूपात मदत जाहीर करून कुटुंबाला आधार देण्याच्या प्रयत्न करण्यात आला.
पो.नि.शंकर शेळके यांना महिला भगिनीं कडून निवेदन सादर
पीडित कुटुंबातील मुलींना त्वरित न्याय देऊन सदरील खटला हा सरकारी वकिल मा.उज्वलजी निकम साहेब यांच्या कडे देण्यात यावा व त्या नराधमास लवकरात लवकर फाशीची शिक्षा दिली जावी अश्या स्वरूपातील निवेदन यावेळी धरणगाव पोलीस ठाण्याचे पो.नि.शंकर शेळके यांना देण्यात आले प्रसंगी मा.धरणगाव तहसीलदार सुद्धा उपस्थित होते.
या प्रसंगाचे गांभीर्य ओळखून पो.नि.शेळके साहेबांनी माता भगिनींना आश्वाशीत केले की पीडित कुटूंबाला योग्य तो न्याय मा.न्यायालय देईल यात शंका नाही आणि तसेच मुलींना मनोधैर्य योजनेअंतर्गत सुद्धा मदत मिळवून देण्यात येईल व कुटूंबाला योग्य ते सहकार्य व सुरक्षा प्रदान करण्यात येईल. असे सांगून निवेदन स्वीकारले.
शिवसेनेचे संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ,डी जी पाटील,माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी,ज्ञानेश्वर महाजन, नगराध्यक्ष निलेश चौधरी, तेली समाज युवक जिल्हा अध्यक्ष सुनील चौधरी पी एम पाटील,भानुदास विसावे उपस्थित होते.