महिंद्रा कारची उभ्या ट्रकला धडक
पिंपळकोठा फाट्यावरील घटना.
एरंडोल- भरधाव वेगाने जाणा-या महिंद्रा एक्स.यु.व्ही.कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला मागील बाजूने दिलेल्या जोरदार धडकेत जांभळी (ता.चाळीसगाव) येथील चार जण जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला.ठार झालेल्यांमध्ये एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयातील एका कर्मचा-याचा समावेश आहे.अपघातात मरण पावलेले सर्व जण जळगाव येथे मित्राला सोडण्यासाठी जात होते.हा अपघात आज रात्री साडेसात वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील पिंपळकोठा (ता.एरंडोल) गावाच्या प्रवेशद्वाराजवळ झाला.अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुमारे एक तास ठप्प झाली होती.
याबाबत माहिती अशी,की जांभळी (ता.चाळीसगाव) येथून परदेशी परिवारातील सदस्य भडगाव येथे विवाहासाठी महिंद्रा एक्स.यु.व्ही.क्रमांक एम.एच.१९ सी.झेड ७३६० ने आले होते.विवाह समारंभ आटोपल्यानंतर सर्वजण कारणे एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी तुषार उर्फ जयदीप मदनसिंग परदेशी याना भेटण्यासाठी एरंडोल येथे आले.
तुषार परदेशी हे रिंगणगाव येथे गेलेले असल्यामुळे त्याना घेण्यासाठी ते रिंगणगाव येथे गेले आणि त्यास जळगाव येथे घरी सोडण्यासाठी जात होते.सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने जाणा-या महिंद्रा कारने पिंपळकोठा गावाच्या प्रवेशद्वाराजवळ उभ्या असलेल्या ट्रक क्रमांक एम.एच.१८ ए.ए.८८५७ ला मागील बाजूने जोरदार धडक दिल्यामुळे कारमधील विजयसिंग हरी परदेशी रा.जांभळी ता.चाळीसगाव,चतरसिंग परमसिंग परदेशी वय ३८ रा.जांभळी,तुषार उर्फ जयदीप मदनसिंग परदेशी वय ३५ ह.मुक्काम जळगाव,आणि आबा रामचंद्र पाटील वय ५८ रा.वडजी ता.भडगाव चार जण जागीच ठार झाले तर एक जण जखमी झाला.
अपघात इतका भयानक होता की भरधाव वेगाने जाणारी कार उभ्या ट्रकच्या मागील बाजूने आत घुसली होती.अपघात होताच जोरदार आवाज झाल्यामुळे पिंपळकोठा व परिसरातील ग्रामस्थानी अपघातस्थळी धाव घेतली आणि मदत कार्यास सुरुवात केली.पिंपळकोठा येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष लहू चव्हाण,कुंदन बडगुजर,गुलाब बडगुजर,मनोज बडगुजर,उमर खान,राधेशाम बडगुजर,राजू बडगुजर,ईश्वर पाटील,सागर बडगुजर,दीपक कैकाडी,दीपक बडगुजर,ज्ञानेश्वर पाटील,मुकेश माळी यांचेसह ग्रामस्थांनी अपघातग्रस्त कारमधून मृतदेह बाहेर काढले.अपघातग्रस्त ट्रक पिंपळकोठा येथे प्रवाशांना उतरविण्यासाठी थांबली.
ट्रकमधून प्रवासी उतरत असतानाच महिंद्रा कार म्त्राकाच्या मागील बाजूवर धडकली.अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव हवालदार अनिल पाटील,पंकज पाटील,महेंद्र पाटील,मिलिंद कुमावत,अकिल मुजावर,विकास खैरनार,महेंद्र चौधरी यांचेसह ग्रामस्थांनी अपघातग्रस्त दोन्ही वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत सुरु केली.
अपघातात मयत झालेले तुषार परदेशी हे ग्रामीण रुग्णालयात नौकरीस असून ज्या रुग्णालयात नौकरी केली त्याच रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्याची दुर्दैवाने वेळ आली.याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलीस स्थानकात अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.