पारोळा :- तालुक्यात माहे एप्रिल २०२३ मध्ये वादळी वारा व पावसामुळे टिटवी व म्हसवे येथील शेतकऱ्यांचे पशुधन मयत झाले होते. संबंधित शेतकऱ्यांनी आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांचेकडे नुकसान भरपाई मिळणेसाठी मागणी केली होती. याची आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी तातडीने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामे करून प्रस्ताव शासन दरबारी सादर करण्याचा सुचना दिल्या होत्या.
त्याचा आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी योग्य तो पाठपुरावा करून आज संबंधित शेतकऱ्यांना पशुधनाच्या नुकसानीचा अर्थसहाय्याचा धनादेश आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांचा हस्ते प्रदान करण्यात आले. याप्रसंगी तहसिलदार डाॕ.उल्हास देवरे, म्हसवे मा.उपसरपंच साहेबराव पाटील, उपतालुकाप्रमुख समाधान मगर, शुभम बोरसे, संदीप पवार यांचेसह पशुधन धारक शेतकरी उपस्थित होते.
हे पण वाचा
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम