धरणगाव बालिका अत्याचार प्रकरणातील आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी.

Spread the love

तेली समाज,महिला मंडळ पदाधिकारी आणि सर्वपक्षीय पदाधिका-यांची मागणी


प्रतिनिधी । एरंडोल
एरंडोल- धरणगाव येथील दोन अल्पवयीन बालीकांवरील अत्याचार प्रकरण गुन्ह्यात तत्काळ आरपपत्र दाखल करून खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा अशी मागणी तालुका तेली समाज,शहरातील विविध महिला मंडळाच्या पदाधिकारी व सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिका-यांनी तहसीलदार सुचिता चव्हाण याना दिलेल्या निवेदनात केली आहे.

धरणगाव येथील बालिका अत्याचाराचा निषेधार्थ तेली समाज,महिला मंडळ पदाधिकारी आणि राजकीत पक्षांच्या पदाधिका-यांनी पंचायत समिती कार्यालयापासून मोर्चा काढून घटनेचा निषेध केला.

धरणगाव येथे दोन अल्पवयीन बालिकांवर चंदुलाल मराठे या नराधमाने अत्याचार केला असून या खटल्यात सरकारी वकील म्हणून advt.उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.याबाबत तहसीलदार सुचिता चव्हाण यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,की धरणगाव येथील अत्याचारग्रस्त बालिकांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्यात यावे.तसेच दोन्ही बालिकांना शासकीय मदत देण्यात यावी.अत्याचार करणा-या नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी.पिडीत बालिकांचा शिक्षणाचा खर्च शासनाने करावा,वयात आल्यानंतर दोन्ही बालिकांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.मोर्चात जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील,नगराध्यक्ष रमेश परदेशी,शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख महानंदा पाटील,राष्ट्रवादी कोंग्रेसच्या तालुकाध्यक्षा मंजुषा देसले,माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील,नगरसेविका छाया दाभाडे,वर्षा शिंदे,सुरेखा चौधरी,प्रतिभा पाटील,नगरसेवक बबलू चौधरी,असलम पिंजारी,बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन,संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य आनंदा चौधरी (भगत),समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन,गोरख चौधरी,राजेंद्र शिंदे,कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय महाजन,सुनील चौधरी,डॉ.राजेंद्र चौधरी,तेली समाजाचे अध्यक्ष अनिल चौधरी,चिंतामण पाटील,अजेंद्र पाटील,सुनील पाटील,नितीन महाजन,डॉ.नरेंद्र पाटील,युवासेनेचे शहरप्रमुख अतुल महाजन,कुणाल महाजन,अनिल चौधरी,माजी उपनगराध्यक्ष अशोक चौधरी,गजानन पाटील प्रमोद महाजन,आरती ठाकूर,निशा विंचूरकर,शोभना साळी,डॉ.उज्वला राठी यांचेसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व महिला मंडळांच्या प्रतिनिधी तसेच तेली समाजाचे तालुकाध्यक्ष गुलाब चौधरी युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष रवींद्र चौधरी,सचिव आर डी चौधरी,भास्कर चौधरी,सुभाष चौधरी,दशरथ चौधरी,सुनील चौधरीरवींद्र चौधरी कैलास चौधरी यांचे सह शेकडोच्या संख्येने तेली समाजाचे नागरिकासह इतर समाजातील नागरिक यावेळी उपस्थित होते.

निषेधपर मनोगत व्यक्त


तेली समाज युवक आघाडीचे सरचिटणीस संजय चौधरी यांनी समाजाच्या वतीने आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच आमदर चिमणराव पाटील यांनी विधानसभेत हा प्रश्न मांडून या पीडित बालिके कडून अँड उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात यावी.


शिवसेनेच्या महिला आघाडी प्रमुख महानंदा पाटील,जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील,काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विजय महाजन ,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. मनोज पाटील,माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,महिला मंडळाच्या अध्यक्षा शोभा साळी,माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील,तसेच युवा विद्यार्थी हितेश चौधरी यांनी आपले या घटनेच्यानिषेध पर आपले मनोगत व्यक्त केले.

टीम झुंजार