5 Tips To a Soothe a Burnt Tongue : अनेक वेळा गरमागरम चहा, कॉफी पिताना किंवा काहीही गरम खाताना जीभ जळते. यामुळे खूप त्रास होतो, खाण्यात अडचणी येतात…. यासाठी काही सोप्या टिप्स…
जीभ हा आपल्या शरीरातील सर्वात नाजूक अवयव आहे. जीभ हा डोळ्यांप्रमाणेच एक संवेदनशील भाग आहे. कारण चमचमीत, तिखट, गोड, आबंट, कडू, खारट या सर्व चवींचा आस्वाद आणि आनंद आपण जीभेत असलेल्या चवी ओळखण्याच्या गुणधर्मामुळेच घेऊ शकतो. आपल्यापैकी बऱ्याचजणांची काहीवेळा बोलताना, जेवताना जीभ अचानकपणे चावली जाते. अशावेळी वेदना तर होतातच पण पाणी पिताना देखील त्याचा दाह सहन करावा लागतो. कधी अचानकपणे जीभ दाताखाली चावणे ही एक सामान्य समस्या आहे. परंतु या छोट्याशा समस्येमुळे जेवताना किंवा काहीही खाताना खूप त्रास सहन करावा लागतो.
जीभ दातांखाली चावल्यानंतर इतक्या असह्य वेदना होतात की या समस्येला कसे तोंड द्यावे हेच नेमके समजत नाही. काहीवेळा जीभ इतक्या जोरात चावली जाते की, जिभेला जखम होते, रक्त येत आणि ही जखम लगेच बरी होणारी देखील नसते. त्यामुळे ही जखम बरी होण्यासाठी काही दिवस जावे लागतात. जोपर्यंत ही जखम बरी होत नाही तोपर्यंत काही खाणे – पिणे फारच कठीण होऊन बसते. जीभ चावण्यासोबतच काहीवेळा गरम अन्नपदार्थ खाताना जीभ भाजली देखील जाते. भाजलेल्या जिभेने काही खाणे सहन न होणारे असते. जीभ चावल्यानंतर तसेच गरम अन्नपदार्थ खाल्ल्यावर भाजली की ती बरी होण्यासाठी आपण असंख्य उपाय करून पाहतो. आज असेच काही घरगुती आजीच्या पोतडीतील उपाय समजून घेऊयात.
जीभ भाजल्यानंतर किंवा चावल्यानंतर नेमके काय उपाय करावेत ?

१. बर्फ किंवा आईस्क्रीम खावी :-
बर्फात दुखणं आणि सूज कमी करणारे गुणधर्म असतात. त्यामुळे बर्फ जिभेवरील सूज आणि जखमेपासून आराम देण्यास लाभदायक ठरु शकतो. बर्फाचा तुकडा जखमेवर सहन होईल तितका वेळ धरुन ठेवा. जीभ चावली किंवा भाजल्यानंतर लगेच त्या भागांवर बर्फाचा खडा चोळावा. बर्फाचा थंडगार खडा चोळल्याने जिभेच्या भाजलेल्या भागाला आराम मिळतो. बर्फाप्रमाणेच भाजलेल्या जिभेची जळजळ रोखण्यासाठी आपण आईस्क्रीम खाण्याचा देखील पर्याय निवडू शकता.
२. मिठाच्या पाण्याने करा गुळण्या :-

मिठामध्ये सोडियम क्लोराईड असतं जे की जखमेवरील सूज आणि दुखणं कमी करण्यासाठी मदत करतं. मिठामधील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म जखमेपासून होणा-या संक्रमणाला दूर ठेवतात. एक कप किंवा एक ग्लास पाण्यास एक चमचा मीठ घाला. त्या मिठाच्या पाण्याने गुळण्या करा. ही प्रक्रिया दिवसातून ४ ते ५ वेळा केल्याने तोंडातील जखम भरुन येण्यास जास्त कालावधी लागणार नाही आणि त्यावरील बॅक्टेरीया देखील निघून जातील.
३. तुळशीच्या पानांचा रस :-

तुळशीमध्ये अँटीइन्फ्लामेट्री, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टीक गुणधर्म असतात. त्यामुळे जिभेवरील फोडांना आणि तोंडातील जखमेला बरं करण्यासाठी तुळशीचा वापर आपण करु शकता. तुळशीची तीन ते चार पानं घेऊन त्यावर मीठ टाकून ती पाने चघळा. तुळशीच्या पानांतून जो रस येईल तो गिळून टाका. ही क्रिया दिवसातून दोन ते तीन वेळा केल्याने भाजलेली जीभ बरी होण्यास मदत मिळते.
४. मध किंवा साखरेमुळे आराम मिळेल :-

जर आपली जीभ जळत असेल तर आपण लगेच मध किंवा साखर खाऊ शकता. मधामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळतात, त्यामुळे ते जिभेवर लावल्याने संसर्गाचा धोका दूर होतो. इतकंच नाही तर वेदनांपासूनही आराम मिळतो.
५. थंड पाणी प्यावे :-

जीभ जळल्यानंतर लगेच थंड पाणी प्यावे. कोल्ड ड्रिंकमुळे जळलेल्या जिभेला त्वरित आराम मिळतो. गरम अन्नपदार्थांमुळे भाजलेल्या जिभेचा दाह कमी करण्यासाठी आपण थंड पाणी किंवा थंडगार कोल्ड ड्रिंक्स पिण्याचा पर्याय निवडू शकता.
हे वाचलंत का ?
- शासकीय ज्वारी खरेदीत वर्षानुवर्षे शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्यांना पुर्णविराम लागण्यासाठी आवश्यक ते नियोजन करूनच खरेदी सुरू करा…आ.अमोलदादा पाटील
- एका वयस्कर व्यक्तीस अंघोळ करताना नग्नावस्थेतील तरुणीच्या व्हिडीओ कॉल आला मग….. ब्लॅकमेलिंग करून 14 लाख 66 हजार उकळले,काय आहे प्रकरण वाचा.
- गुगलच्या मदतीने बनविलेले विषारी फुलांचे ज्यूस पाजून सैतान मुख्याध्यापिका पत्नीनं शिक्षक पतीला संपवलं; विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह पण……
- ३ लाख २५ हजार रुपयांचे सोन्याचे दागीने आणि रोख रक्कमेची घरफोडी करणाऱ्या चोरट्यास मेहूणबारे पोलिसांनी केले जेरबंद.
- सासूने घेतला चोरीचा आरोप कंटाळून महिलेने आत्महत्या करण्यासाठी कालव्यात मारली उडी वाचवण्यासाठी हवालदार धावला; महिला वाचली पण हवालदाराने जीव गमावला.