भडगांव – रूढी,परंपरा, चालीरीती,बुवाबाजी,नवस म्हणजे गरिबांची पिळवणूक असते अशिक्षित,गरिबांना श्रीमंत लोक फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी वापरून गुलाम बनवत असतात म्हणून शिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध असते ते आपल्या मुलांना देऊन दारिद्रतून आपला विकास करा असे गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात ग्रामस्थांना पोट तिडकिने सांगणारे विद्यापीठ होय”असे संगीता जाधव म्हणाल्या.प्रमुख पाहुणे म्हणून जयश्री देशमुख होत्या.
माऊली फाऊडेशनच्या वतीने अदितीपार्लर येथे संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन माल्यार्पण कु जयश्री देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले सौ संगीता जाधव यांनी गाडगेबाबाच्या जिवनपटाची माहिती सांगीतली कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मीरा जाधव यांनी केले तर सुशील महाजन यांनी आभार मानले यावेळी माऊलीचे
स्वंयसेवक देवेन्द पाटील,सीमा महाजन,गायत्री पाटील,दिलीप महाजन संतोष पाटील उपस्थित होते यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थिती होती