बांसवाडा (राजस्थान):- जिल्ह्यातून अनैतिक संबंधातून घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे.इथे तीन मुलांची आणि पाच मुलांचा पिता एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघेही नात्याने वहिनी आणि दीर लागत होते. नात्याला काळिमा फासणाऱ्या या केसमध्ये दोघेही घरातून फरार झाले होते. नंतर त्यांनी जंगलात जाऊन आत्महत्या केली. तीन-चार दिवस याची कुणालाही खबर नव्हती. पण काही दिवसांनी लोकांना जंगलात त्यांचे लटकलेले मृतदेह दिसले तेव्हा सगळ्यांना धक्का बसला. दोघांचेही मृतदेह सडलेले होते आणि काळे पडले होते.
पोलिसांनी सांगितलं की, इथे 3 जून रोजी आमजा गावातील जंगलात एक महिला आणि पुरूषाचा मृतदेह लटकलेला आढळून आला होता. दोघांचेही मृतदेह काही दिवसांपासून लटकलेले असल्याने काळे पडले होते आणि त्यातून वासही येत होता. गावातील लोकांनी मृतदेह पाहून पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह खाली काढले. हे मृतदेह कालू (40) आणि बबली (39) यांचे होते.
पोलिसांनी सांगितलं की, प्राथमिक चौकशीतून समोर आलं की, दोघेही नात्याने दीर आणि वहिनी लागत होते. काही दिवसांआधी दोघेही घरातून गायब झाले होते. त्यानंतर बबलीच्या पतीने पोलिसात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यासोबतच आपला भाऊ कालू विरोधातही तक्रार दाखल केली होती. पोलीस दोघांचाही शोध घेत होते. अशात त्यांचे मृतदेह आढळून आले. दोघांचेही प्रेम संबंध असण्याची शक्यता आहे.
चौकशीतून समोर आलं की, बबलीला तीन मुले आहेत. त्यातील एकाचं लग्न झालं आहे. तेच दीर कालू याला पाच मुलं आहेत. यातील 4 मुली आहेत आणि एक मुलगा आहे. यातील 3 मुलींची लग्ने झाली आहेत. पोलिसांनी कायदेशीर कारवाई करत मृतदेहांचं पोस्टमार्टम केलं. त्यानंतर मृतदेह कुटुंबियांना दिले. पोलीस पुढील चौकशी करत आहेत.
हे पण वाचा
- Viral Video: मार्केटमध्ये एक सुंदर ड्रेस दोन महिलांना आवडला तो घेण्यावरून सुरू झाला वाद मग सुरू झाली तुंबळ हाणामारी पहा व्हिडिओ
- महाविद्यालयाच्या हॉस्टेलच्या बाथरूममध्ये इतर मुलींचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ शूट करून तरुणीने क्लिप्स पाठवल्या प्रियकरास, तरुणीस पोलिसांनी घेतले ताब्यात.
- हृदयद्रावक! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी हळद सुकण्यापूर्वीच नववधूच्या मांडीवर डोके टेकत नवरदेवाने सोडला प्राण, सर्वत्र हळहळ.
- संघटित गुन्हे करणाऱ्या घरफोडीतील गुन्हेगारांना एमआयडीसी पोलिसांनी केले जेरबंद,१लाख ८५ हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त.
- Viral Video:एक्स्प्रेसवेवर तरुणांची सुसाट वेगाने बाईक चालवत जीवघेणी स्टंटबाजी; तोल जाताच कोसळले, मागून आला ट्रक अन् पहा काळजात धडकी भरेल असा व्हिडिओ.