30 वर्षाची अप्सरा पडली पुजाऱ्याचा प्रेमात, एक दिवशी तिला घेवून गोशाळेत गेला,तेथे केली तिची हत्या,मृतदेह पुरला मंदिराच्या मागे

Spread the love

हैदराबाद :- येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका पुजार्‍याने आपल्या प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह मंदिराच्या मागे पुरला आहे. साई कृष्ण नावाचा पुजारी आणि अप्सरा नावाच्या मुलीचे एकमेकांवर प्रेम होते.मोठी गोष्ट म्हणजे पुजारी साई कृष्ण विवाहित आहे आणि त्यांना एक मूल असल्याचेही समजत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३६ वर्षांचा साई कृष्णा पुजाऱ्याचं काम करत होता. तर ३० वर्षांची अप्सरा एका खासगी कंपनीत कामाला होती. साई कृष्णा पुजाऱ्यासोबत बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर म्हणूनही काम करायचा, अशीही माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्परा साई कृष्णासोबतच सुलतानपल्ली येथील एका गोशाळेत गेली होती. तिथे तिची हत्या करण्यात आली. हत्येनंतर साई कृष्णाने अप्सराचा मृतदेह मंदिराच्या मागच्या बाजूस पुरला होता. महत्त्वाचं म्हणजे खुद्द साई कृष्णा यानेच पोलिस स्टेशनमध्ये जाऊन अप्सराची मिसिंग कल्पेंट दिली होती. पण पोलिसांच्या तपासातून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पुजाऱ्यानं आपल्याच गर्लफ्रेंडची हत्या का केली? असा नेमका कोणता वाद त्यांच्यामध्ये झाला होता? यासह अनेक प्रश्नही उपस्थित केले जात होते. त्याबाबत ही धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

खरंतर साई कृष्णाचं आधीच लग्न झालं होतं. त्याला एक मुलगाही आहे. पण अप्सराचा पुजाऱ्यावर जीव जडला होता. दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. नंतर नंतर अस्परा लग्नासाठी साईकृष्णावर दबाव टाकत होती. त्यातून अखेर वैतागून साई कृष्णाने अप्सराला संपवण्याचा कट रचल्याचा संशय व्यक्त केला जातोय. आता याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. पण हा धक्कादायक प्रकरा समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

अप्सरा प्रायव्हेट कंपनीत नोकरी करायची. पुजारी म्हणून काम करणारा साई कृष्ण हा शरूरनगर परिसरात राहत होता. पोलिसांनी सांगितले की, नारकुडा गावात राहणारी 30 वर्षीय अप्सरा एका खासगी कंपनीत काम करायची. पोलिसांनी सांगितले की, अप्सरा साई कृष्णासोबत सुल्तानपल्ली येथील गोशाळेत गेली आणि तिथे कृष्णाने तिची हत्या केली. हत्येनंतर साई कृष्णाने अप्सराचा मृतदेह मंदिराच्या मागे पुरला. विशेष म्हणजे मारेकरी साई कृष्णाने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन अप्सरा हरवल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांसमोर पुजाऱ्याने गुन्ह्याची कबुली दिली यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि साईकृष्णाची चौकशी केली असता त्याने पोलिसांसमोर खुनाचा गुन्हा कबूल केला. आता हैदराबाद पोलिसांनी बेपत्ता प्रकरणाचे रुपांतर खुनाच्या प्रकरणात करून तपास सुरू केला आहे.

टीम झुंजार