वाचन संस्कृतीने माणूसकीचे दर्शन घडते- प्राचार्य डॉ.एन. एन. गायकवाड.

Spread the love

भडगाव- “आदर्श व्यक्ती घडवायचा असेल वाचन,मनन, पठण,संग्रहण,समन्वयन,
विचार विनिमय व संवादाने संस्कार आत्मसात करता येतात पुस्तक वाचनाने मस्तक संस्कारित होत असते, राम, कृष्ण महाभारत वाचनच्या गोष्टी विद्यार्थ्यांना अंकलन,शिकवण, यामधून संस्कारांची रुजवण होत असते” असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. एन.एन.गायकवाड यांनी केले.ते कवयित्री बहिणाबाई ग्रामवाचन कट्टा या बद्दल ग्रामस्थांना माहिती सांगितली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाधान पाटील होते. यावेळी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी ग्रामवाचन कट्यात ग्रामस्थ व विद्यार्थ्यांसाठी चरित्र, आत्मचरित्र इतिहास, ज्ञानगंगा अशी पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी बहिणाबाई चौधरी ग्रामवाचन कट्टा नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली. अध्यक्ष- समाधान पाटील,सचिव संदीप पाटील,उपाध्यक्ष दिलीप पाटील, कार्याध्यक्ष देवेंद्रसिंग पाटील सदस्य उदयसिंग पाटील, भगत सिग पाटील, मंगलसिंग पाटील विश्वास पाटील, कैलास पाटील, संजय पाटील, प्रकाश महाजन माणिक पाटील, गणेश पाटील, उत्तम पाटील,मनीषा पाटील प्रतिभा पाटील अशी समिती गठित करण्यात आली.यावेळी उपप्राचार्य प्रा.एस. आर.पाटील श्री वानखेडे, गणसिंग पाटील, विजय पाटील,उदेसिंग पाटील, प्रा.एम.डी.बिर्ला, प्रा.दिनेश तांदळे .श्री. हौसारे सर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. जी. एस. अहिरराव कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना यांनी तर आभारप्रदर्शन प्रा.सुरेश कोळी यांनी केले.दत्तक गाव वडगाव येथे आयोजित करण्यात आला होता

टीम झुंजार