एरंडोल :- येथील पाताळ नगरी भागातील 65 वर्षीय प्रौढ व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
माहिती अशी की पाताळनगरी परिसरात राहणारे शिवराम गंगाराम महाले वय 65 वर्षे यांनी त्यांच्या राहत्या घरातील लाकडी सऱ्यास रूमालाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
मयताच्या पुतण्यास अज्ञात व्यक्तीने मोबाईल करून तुझ्या काकांनी आत्महत्या केली असल्याचे कळवल्यामुळे ते घटनास्थळी आले. या ठिकाणी मयताचे पुतणे राजेंद्र महाले ,श्याम जाधव, सुमित महाले, अमोल शिरसाळे यांनी शिवराम महाले यांना खाली उतरून ग्रामीण रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना तपासून ते मयत झाल्याचे सांगितले.
मयत शिवराम महाले घरी एकटेच राहत होते. त्यांच्या पत्नी चलथान (गुजरात) येथे मुलाकडे गेल्या होत्या. मयताच्या पश्चात पत्नी एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. याबाबत चेतन बाबूलाल महाले यांनी दिलेल्या माहितीवरून पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून हवालदार संतोष चौधरी हे पुढील तपास करीत आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






