समता शिक्षक परिषदेचे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांना निवेदन व विविध विषयांवर चर्चा

Spread the love

जळगाव :- महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदे मार्फत समाज कल्याण विभाग महाराष्ट्राचे आयुक्त डॉक्टर प्रशांत नारनवरे यांची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव रेस्ट हाऊस मध्ये भेट घेण्यात आली. संघटनेचे माध्यमिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाठ, नाशिक जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, जळगाव जिल्हाध्यक्ष रणजीत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सहा मुद्द्यांच्या अनुषंगाने निवेदन देण्यात आले.


स्वाधार योजनेची व्याप्ती वाढवून एका गावातून दुसऱ्या गावी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या परराज्यात शिक्षण घेणाऱ्या पाल्यांना कोणत्याही उत्पन्नाची अट न लावता शिष्यवृत्ती व फ्रीशीप चा लाभ देण्यात यावा. इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्याच्या प्री- मॅट्रिक शिष्यवृत्तीची व्यवस्थित अंमलबजावणी करण्यात यावी. परदेशी शिष्यवृत्तीच्या लाभार्थी विद्यार्थी संख्येमध्ये दुपटीने वाढ करण्यात यावी. परराज्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती मध्ये समाविष्ट महाविद्यालयांची संख्या वाढवावी. तसेच त्यासाठीची उत्पन्न मर्यादा आठ लाख करण्यात यावी.


अशा विविध मुद्द्यांचे निवेदन संघटनेच्या शिष्टमंडळमार्फत देण्यात आले.
शिष्यवृत्ती संदर्भातील विविध प्रश्नांवरती सखोल चर्चा झाली. स्वाधार योजनेची व्याप्ती तालुका पर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासन कार्यरत असून संघटनेच्या मागणी प्रमाणे स्वाधार योजनेच्या व्याप्तीचा मुद्दा मार्गी लावला जाईल तसेच संघटनेच्या अन्य मुद्द्यांवर सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन डॉक्टर प्रशांत नारनवरे यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले.
समता शिक्षक परिषदेचे जळगाव जिल्हा सचिव सुधाकर मोरे, सहसचिव भारती ठाकरे, जिल्हा सदस्य चिंतामण जाधव, सुषमा जवादे , डॉक्टर शुभम जाधव आदींची उपस्थिती निवेदन प्रसंगी होती.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार