धरणगाव l प्रतिनिधी :- येथील पारधीवाडा परिसरातील एका घराचे बांधकाम सुरु असताना एका बांधकाम मजुराला विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. परमेश्वर रतीलाल चव्हाण (वय ३६) असे मयत बांधकाम मजुराचे नाव आहे. दरम्यान, सकाळी घरात पत्नी आणि मुलांसोबत गप्पा मारून कामावर गेल्यावर अवघ्या काही वेळात निधन वार्ता धडकल्यानंतर पत्नीसह मुलांनी मन हेलावून सोडणारा आक्रोश केला.
या संदर्भात अधिक माहिती अशी असे की, दि. १० रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास परमेश्वर रतीलाल चव्हाण हे घरासमोरील मिराबाई बाप संतोष पारधी यांचे घराचे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी कामावर गेले होते. परमेश्वर घरावरील गच्चीवर प्लास्टर करीत असतांना अचानक घरावरुन गेलेल्या इलेक्ट्रिक तारांचा शॉक जागीच कोसळला. सहकारी मिस्त्रीनी तात्काळ त्यांच्या दिशेने धाव घेतली. परमेश्वर काही एक हालचाल करीत नव्हता.
तसेच त्याचा डावा हात काळपट झालेला होता. त्यामुळे त्यास लागलीच खाजगी वाहनाने धरणगाव ग्रामिण रुग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतू डॉक्टरांनी तपासून त्यास मयत घोषीत केले. या प्रकरणी पंकज चव्हाण यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो.ना. प्रमोद पाटील हे करीत आहेत. दरम्यान, पत्नीसह मुलांचा मन हेलावून सोडणारा आक्रोश बघून उपस्थितांच्या डोळ्यातही पाणी आले होते.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






