सिद्धार्थ तिवारी या मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचा जवळचा नातेवाईक अतुल याच्यासोबत अनुपम एका कॅन्टिनमध्ये काम करत होता. अतुलमुळे सिद्धार्थ तिवारी आणि अनुपम तिवारी यांच्यात मैत्री झाली.यात एकमेकांच्या घरी जाणं येणं वाढलं. याच काळात अनुपमच्या आईला या सिद्धार्थ तिवारी आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं.
लखनौ :- गेल्या सव्वा महिन्यापासून पोलिासंसमोर आव्हान ठरलेल्या एका हत्याकांडाचा अखेर उलगडा झालाय. मैत्रीत केलेला दगा फटका आणि अनैतिक संबंधातून हे हत्याकांड घडल्याचं समोर आलंय. आरोपीनं आपल्या मित्राला आईसोबत आपत्तीजनक स्थितीत पाहिलं होतं. त्यानंतर त्याच्या मनात मित्राबाबत प्रचंड घृणा निर्माण झाली. कसंही करुन मित्राचा बदला घ्यायचाच असं या आरोपीनं ठरवलं. त्यानंतर 63 दिवस म्हणजे सुमारे दोन महिने आरोपीनं वाट पाहिली. त्यानंतर नियोजित कट रचला आणि मित्राची हत्या केली. या मित्राची हत्या करुनही त्याचं समाधान झालं नाही, त्यामुळं त्यानं मित्राचा प्रायव्हेट पार्टच कापून टाकला.
कसा उघडकीस आला प्रकार……
लखनौ शहरात 5 मे रोजी सुरक्षारक्षक असलेल्या सिद्धार्थ तिवारी याचा मृतदेह सापडला होता. या हत्याकांडाचा उलगडा सव्वा महिन्यानंतर झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिलीय. आरोपीचं नाव अनुपम तिवारी असं असून तो इटोजाचा रहिवासी आहे. लखनौच्या मडियावमध्ये आरोपी त्याच्या आईसह आणि मोठ्या भावासह राहत होता. सिद्धार्थ तिवारी या मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचा जवळचा नातेवाईक अतुल याच्यासोबत अनुपम एका कॅन्टिनमध्ये काम करत होता.
अतुलमुळे सिद्धार्थ तिवारी आणि अनुपम तिवारी यांच्यात मैत्री झाली. यात एकमेकांच्या घरी जाणं येणं वाढलं. याच काळात अनुपमच्या आईला या सिद्धार्थ तिवारी आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. अनुपमचे वडील आजारामुळं त्यांच्या गावीच राहत होते. तर आई तिच्या दोन्ही मुलांसह लखनौत राहत होती. मृत सिद्धार्थ आणि अनुपमच्या आईत घनिष्ठ संबंध निर्माण झाले होते. त्यानंतर अनुपमला सिद्धार्थवर संशय येण्यास सुरुवात झाली.
2 मार्चला आईसोबत सिद्धार्थला पाहिलं…….
2 मार्च रोजी अनुपमनं त्याच्या आईच्या खोलीत कुणीतरी असल्याचं पाहिलं आणि तो त्या ठइकाणाहून गुपचूप निघून गेला. काही वेळानंतर सिद्धार्थ घरातून बाहेर पडल्याचं त्यानं पाहिलं आणि त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. मित्रानं केलेल्या दगाफटक्यानं दुखावलेल्या अनुपमनं रात्री मद्यपान केलं आणि हत्येचा कट रचला. मृत सिद्धार्थ हा मोबाील वापरत नव्हता. त्यामुळं त्याच्याशी संपर्क साधणं आरोपी अनुपमला शक्य नव्हतं. पण अनुपम खिशात चाकू ठेवून सिद्धार्थ जात-येत असलेल्या ठिकाणी त्याची वाट पाहत होता. अखेरीस 4 मेला दारु विकत असताना अनुपमची गाठ सिद्धार्थशी पडली.
कशी केली हत्या……
त्यानंतर अनुपमनं गोड बोलून त्यानं सिद्धार्थला दारु पाजली. त्यानंतर सिद्धार्थला घेऊन तो एका निर्जन स्थळी गेला. सिद्धार्थ जेव्हा नशेत होता, त्यावेळी अनुपमनं त्याच्या डोक्यावर चाकूनं वार केला. मोठे दगड उचलून ते चेहऱ्यावर मारुन त्यानं सिद्धार्थचा चेहरा विद्रुप केला. तरीही अनुपमचा राग कमी होत नव्हता, अखेरीस त्यानं मृत सिद्धार्थचा प्रायव्हेट पार्टही कापला. पोलिसांनी तपास करताना, आधी त्यांना सुगावा लागत नव्हता. अखेरीस अतुलचा दोस्त अनुपम घटनास्थळी होता, अशी माहिती त्यांना मिळाली. पोलिसांनी अनुपमला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यानं गुन्हा कबूल केला.
हे पण वाचा
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम