एरंडोल l प्रतिनिधी एरंडोल:- तालुक्यातील पळासदळ धारागीर शेत शिवारातील कृषी पंपाची विज ही नेहमी गायब होत आहे. त्यामुळे हंगाम पूर्व कपाशी लागवडीचे पिके ही धोक्यात सापडले आहेत. लहान लहान कोम असल्याने ती जळत आहे. परिणामी शेतकरी वर्ग हा कमालीचा संताप व्यक्त करीत आहेत. राज्यात शिंदे फडणवीस सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांकडून ठोकला जात आहे.परंतु प्रत्यक्षात त्याची शेतकऱ्यांना अनुभुती कधी येणार असा प्रश्न शेतकरी विचारात आहे.
कृषी पंपाला आठ तास सुरळीत वीजपुरवठा केला जात असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. मुळात पळासदळ, धारागिर शिवारात दोन तास देखील वीज मिळत नसल्याचा अनुभव शेतकरी घेत आहे. संबंधित अभियंता, शाखा आभियंता, वायरमन याना शेतकरी विचारणा करीत आहे. तर लाईन वरून फॉलटी असल्याचे एकच उत्तरे देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करून थट्टा केली जात आहे. रोज लाईन फॉल्टी सांगून पळसदळ व धारागिरी शिवारात शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. अनेक विहिरींना पाणी असून देखील पिकांना पाणी देणे शक्य होत नसल्याचे शेतकरी चिंतेत पडला आहे.
मान्सूनपूर्व कपाशीची लागवड या भागात मोठ्या प्रमाणात झाली आहे. आहे त्या पाण्यावर पिके जगवण्याची शेतकरी हे दिवस रात्र कसरत करीत आहेत. परंतु वीज ही अखंडित तास अर्धा तास देखील चालत नसल्याने शेतकऱ्यांचे कपाशी पिके पाणी मिळत नसल्याने पूर्णतः धोक्यात आली आहे. लहान लहान कोंब असल्याने ते जळत आहेत. वारंवार सांधणी करून पिके जगण्याचा प्रयत्न हा शेतकरी करीत आहे.
महावितरण कंपनीचा या सावळा गोंधळामुळे व लाईट फॉल्टी मुळे या भागातील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. एकीकडे शेतमालाला भाव नाही. दुसरीकडे हजारो रुपये खर्च करून लावलेल्या कपाशी पिके देखील धोक्यात सापडल्याने शेतकरी मध्ये असंतोष निर्माण झाला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चिमणराव पाटील यांनी गंभीर प्रकाराकडे तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात येत आहे. अन्यथा उपोषणाला बसु असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला दिला आहे.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






