जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
जोडीदाराच्या सहवासात रमून जाल. नवीन ओळखी होतील. चारचौघात तुमचे कौतुक केले जाईल. भागिदारीतून चांगला लाभ मिळेल. कामानिमित्त प्रवास घडेल.
वृषभ :-
दिवस आनंदात जाईल. नवीन कामात हात घालाल. केलेल्या कामातून समाधान मिळेल. सहकार्यांकडून कौतुक केले जाईल. कामे योग्य वेळेत पूर्ण करता येतील.
मिथुन :-
रेस, जुगार यातून लाभ संभवतो. करमणुकीत अधिक वेळ घालवाल. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. संभाषणाची आवड जोपासली जाईल. बुद्धी चातुर्यावर खुश राहाल.
कर्क :-
घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील. कामाचा यथायोग्य आनंद मिळेल. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. सर्वांशी मिळूनमिसळून वागाल. जवळच्या निसर्गरम्य ठिकाणी भेट द्याल.
सिंह :-
प्रवास हसत-खेळत पार पडेल. जवळचे मित्र भेटतील. दिवस आनंदात जाईल. अधिकार्यांशी सल्लामसलत कराल. तरुण वर्गाशी मैत्री कराल.
कन्या :-
कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. सर्व गोष्टींचा सारासार विचार कराल. काही कामांचे मनन कराल. महत्त्वाची कागदपत्रे पुढे सरकतील. कमिशनमधून चांगला धनलाभ होईल.
तूळ :-
दिवस आपल्या मनाप्रमाणे घालवाल. आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्याल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. प्रवासात क्षुल्लक अडचण येऊ शकते. नातेवाईक तुमच्यावर नाराज होऊ शकतात.
वृश्चिक :-
मनात चलबिचलता जाणवेल. ठाम निर्णय घ्यावे लागू शकतात. धार्मिक कामात मन गुंतवावे. मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा करावी. नवीन संधी उपलब्ध होतील.
धनू :-
पारमार्थिक कामात मदत कराल. प्रवासात काळजी घ्यावी लागेल. स्वत:मध्ये काही बदल करून पहावेत. नातेवाईकांशी सलोखा वाढवावा. अनाठायी खर्च होण्याची शक्यता.
मकर :-
कामातील अडचणी दूर होतील. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. स्वत:वरील खर्च वाढू शकतो. घरात काही बदल करावे लागू शकतात. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे.
कुंभ :-
शब्दांची धार थोडी कमी करावी लागेल. परोपकाराची जाणीव ठेवून वागाल. गरज नसताना वस्तू खरेदी केल्या जातील. टापटिपेवर अधिक वेळ घालवाल. स्वभावात काहीसा उधळेपणा येईल.
मीन :-
शेअर्स मधून धनलाभ संभवतो. वारसाहक्काच्या कामातून कमाई सुधारेल. अडचणींवर मात करता येईल. पित्त विकाराचा त्रास संभवतो. किरकोळ जखमांपासून काळजी घ्यावी लागेल.
हेही वाचलंत का ?
- Viral Video: पोलीस स्टेशनबाहेरच गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमध्ये जोरदार राडा; दोघांनी एकमेकांना धु धु धुतले पहा धक्कादायक व्हिडिओ.
- पैशाच्या लालसेपोटी सेवानिवृत्त परिचारीकेच्या केला होता खून; या गुन्ह्यातील ३० लाखांची रक्कम नातेवाईकांना केली परत.
- शेअर मार्केटिंगसाठी लोकांकडून पैसे का घेतो असे बोलण्याच्या राग आल्याने धरणगावात वृद्ध आजीवर नातवाने केला हल्ला. अज्ञाताने हल्ला करून पळून गेल्याच्या केला बनाव.
- पारोळा शिवारात 40 वर्षीय महिलेचा डोक्यात दगड टाकून खून;महिलेची ओळख पटली,आरोपी गजाआड, पारोळा पोलिसांची कामगिरी
- दोघांच्या लग्नाला झाली १३ वर्षे, अचानक महिलेस भेटला तिच्या प्रियकर, दोघांच्या मनावर राहिला नाही ताबा अन् मग पतीने असे केले की……