अश्विन बोरनारे स्टार प्रवाहवरील “ठिपक्यांची रांगोळी ” मालिकेत

Spread the love

निंभोरा (प्रतिनिधी) :- सौरभ आणि अनामिकाच्या राहून गेलेल्या प्रेमाची गोष्ट असलेली झी मराठीवर “तू तेव्हा तशी” या गाजलेल्या मालिकेत “चिंतामणी” ह्या आगळ्यावेगळ्या भूमिकेतून घराघरात पोहचलेला “अश्विन बोरनारे” आता स्टार प्रवाह वरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत झळकला आहे.


मूळ निंभोरा येथील व सध्या मुंबईत वास्तव्याला असलेले रविंद्र दोधू बोरनारे यांचा मुलगा व अनिल बोरनारे यांचा पुतण्या अश्विनचे शालेय शिक्षण उल्हास विद्यालय तर महाविद्यालयीन शिक्षण आर. के. तलरेजा मध्ये झाले. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना ऑडिशन देऊन अश्विनने आतापर्यंत स्टार प्रवाह वरील रंग माझा वेगळा, विठू माऊली, आम्ही दोघे राजा राणी, लेक माझी लाडकी, कलर्स मराठी वरील तू माझा सांगाती, महाराष्ट्र जागते रहो, नवरा असावा तर असा रिऍलिटी शो प्रोमो, झी मराठी वरील माझ्या नवऱ्याची बायको या मालिकांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका केल्या आहेत.

आवड, योगायोग व मेहनत यामुळेच सुंदर पटकथा, दिग्दर्शक सहकलाकार असलेल्या मालिकेत एखादी भूमिका साकारायला मिळणं तसेच सिनमध्ये सुपरस्टार स्वप्नील जोशी यांच्यासह अनेक कलाकारांकडून नवीन गोष्टी शिकायला मिळण हे अश्विन सौभाग्य समजतो
स्टार प्रवाह वरील ठिपक्यांची रांगोळी मालिकेत चंदू भाटवडेकर या विनोदी खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे. ही भूमिका छोटीशी असून काही भागांसाठी जरी असली तरी कहानी मध्ये ट्विस्ट आणणारी हटके भूमिका आहे.

टीम झुंजार