एरंडोल :-शासनाने सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी सुरु केलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत १७४ लाभार्थ्याना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आल्याची माहिती तहसीलदार सुचिता चव्हाण
यांनी दिली.तहसीलदार कार्यालयातर्फे शासन आपल्या दारी योजना पूर्णपणे यशस्वी करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.तहसीलदार कार्यालयातर्फे शासन आपल्या दारी योजनेंतर्गत १७४ नवीन शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले.
यामध्ये २५ आदिवासी लाभार्थ्यांचा समावेश आहे.तसेच १६३ दुय्यम शिधापत्रिका,१०३ नवीन नावांचा शिधापत्रिकेत समावेश करणे व ९५ शिधा पत्रिकेत नावे कमी करणे अशा एकूण ५३५ शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले.पुरवठा निरीक्षक संदीप निळे,अव्वल कारकून नंदकिशोर वाघ यांचेसह पुरवठा विभागातील कर्मचा-यांनी यासाठी सहकार्य केले.तहसीलदार सुचिता चव्हाण यांच्याहस्ते प्रातिनिधिक स्वरूपात आदिवासी बांधवाना शिधा पत्रिकांचे वाटप करण्यात आले.
यावेळी नायब तहसीलदार दिलीप पाटील यांचेसह कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते.तहसीलदार कार्यालयामार्फत यापूर्वी देखील संजय गांधी निराधार योजना,श्रावण बाळ योजना,इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना यासारख्या शासकीय योजनांची ५५४ प्रकरणे मंजूर करून मंजुरीचे पत्र लाभार्थ्याना देण्यात आले आहेत.
आमदार चिमणराव पाटील यांच्या उपस्थितीत पंचायत समिती सभागृहात झालेल्या सर्व शासकीय अधिकारी व विभागप्रमुख यांच्या बैठकीत ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम यशस्वी करण्याबाबत नियोजन करण्यात आले होते.
हे पण वाचा
- Viral Video: एका १८ वर्षीय मुलीवर भटक्या कुत्र्यांच्या टोळीने हल्ला; स्थानिकांच्या मदतीने वाचला जीव पहा अंगाच्या थरकाप होईल असा व्हिडिओ.
- बिबट्या पतीच्या नरडीचा घोट घेणार, तोच पत्नी आली रणरागिणी बनून बिबट्याशी एक तास झुंज देऊन पतीचे वाचविले प्राण, सर्वत्र कौतुक.
- संतापजनक;रक्षकच बनला भक्षक! महिलादिनानिमित्त सत्काराला बोलावून पोलिस कर्मचाऱ्यानेच केला महिलेवर बलात्कार, नागरिकांमध्ये संताप.
- एका व्यक्तीने त्याच्या दोन प्रेयसींसोबत मिळून तिसऱ्या प्रेयसीची केली हत्या; काय आहे प्रकरण व पोलिसांनी आरोपीच्या शोध कसा लावला, वाचा संपूर्ण बातमी.
- छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनी मंत्री गुलाबराव पाटील यांचे अभिवादन; संभाजी महाराजांचे बलिदान म्हणजे राष्ट्रप्रेमाचा सर्वोच्च आदर्श – मंत्री गुलाबराव पाटील