एरंडोल l प्रतिनिधी
एरंडोल:-आज दिनांक 25/6/2023 रोजी महात्मा फुले हायस्कूल एरंडोल येथे सावतामाळी शिक्षण प्रसारक मंडळ जळगाव या संस्थेची संचालक मंडळाची सभा संस्थेचे अध्यक्ष विजय पंढरीनाथ महाजन यांचा अध्यक्ष ते खाली झाली, सदर सभेत महात्मा फुले हायस्कूल एरंडोल चा चेअरमन पदी संस्थेचे जेष्ठ संचालक जयराम शंकर माळी एरंडोल यांची एकमताने निवड करण्यात आली.
अरुणकुमार माळी हे 5 वर्षांपासून चेअरमन होते, त्यांची मुदत संपल्याने त्यांचा जागेवर जयराम माळी यांची नियुक्ती करण्यात आली, चेअरमनपदी जयराम माळी यांची निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष विजय महाजन, अरुणकुमार माळी, रमेश महाजन, राजेंद्र राघो महाजन, दिनेश पाटील उपाध्यक्ष अंमळनेर, संस्थेचे सचिव सुकलाल महाजन धरणगाव, ऍड मनोहर महाजन, रवींद्र महाजन, मुख्याध्यापक जाधव व वाघ भाऊसाहेब यांनी अभिनंदन केले.
हे पण वाचा
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.






