Viral Video :दारु माणसाला काहीही करण्यासाठी भाग पाडू शकते. याच्या अनुभव बऱ्याच लोकांना आला असेल. तसेच तुम्ही काही लोकांना असं करता पाहिलं असेल. नेहमी शांत असलेली व्यक्ती अचानक दारु प्यायल्यानंतर वाघ बनते आणि आकाशातील चंद्र तारे तोडून आणण्याच्या बाता मारते.इथपर्यंत सगळं ठिक आहे. पण एका व्यक्तीनं असा प्रकार केला,
ज्यामुळे आपला जीव देखील त्याने धोक्यात टाकला. सोशल मीडियावर तुम्ही यासंबंधीत अनेक व्हिडीओ पाहिले असतील, जे तुम्हाला कधी हसायला भाग पाडतात. तर कधी पोटात गोळा आणतात.
असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती देशी दारु पिऊन काय करतेय हे कळत नाही. दारुच्या नशेत ही व्यक्ती थेट बैलावर येऊन बसली आणि बैलाला त्रास देऊ लागली. ज्यानंतर बैल देखील फार चिढला.
आधी या रागावलेल्या बैलानं आपल्या पाठीवरील व्यक्तीला खाली पडलं. पण तरी देखील ही व्यक्ती बैलाला त्रास देणं सुरुच ठेवते.हा माणूस बैलाला मारतो सुद्धा. पुढे जेव्हा बैल रस्त्यावर बसलेला असतो, तेव्हा हा माणूस त्याच्यावर पुन्हा जाऊन बसतो, ज्यानंतर बैल रस्त्यावर सरळ आडवा होतो आणि या दारुड्याला पुन्हा खाली पाडतो.
इतकं सगळं होऊन देखील या दारुड्याची मस्ती संपत नाही तो थेट बैलाच्या शिंगांकडे जातो आणि बैलाची मान पकडतो. ज्यानंतर बैल त्याला आपल्या शिंगानी उडवतो आणि खाली पडतो. इतकं सगळं होऊन देखील हा दारुडा बैलाच्या हात धुवून मागे लागला आहे. हा व्हिडीओ फारच मजेदार आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी देखील भरभरुन कमेंट्स केल्या आहेत.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






