जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
कामाच्या स्वरुपात काहीसे बदल करायला हरकत नाही. नवीन ओळख बनवता येईल. गैरसमजुतीचे प्रसंग येऊ शकतात. प्रवासात काळजी घ्यावी. सामुदायिक वादात लक्ष घालू नका.
वृषभ :-
काही कामात अधिक कष्ट घ्यावे लागतील. सतत खटपट करत राहाल. जवळच्या व्यक्तींच्या सहवासाची ओढ वाढेल. सर्वांशी जुळवून घ्यावे लागेल. आवडत्या गोष्टीत रमून जाल.
मिथुन :-
कामात काही अनपेक्षित बदल दिसून येतील. उत्तम कार्यशक्ती लाभेल. दर्जा जपण्यासाठी धडपड कराल. ईर्षेने परिस्थितीवर मात कराल. संघर्षमय स्थितीपासून लांब राहावे.
कर्क :-
उपासनेत अधिक वेळ घालवावा. गैरसमजातून होणारी कटुता टाळा. आपले मत इतरांवर लादू नका. नियमित व्यायामावर भर द्यावा. शांत विचार करण्याची गरज भासेल.
सिंह :-
व्यक्तिमत्व विकासावर भर द्या. अंगीभूत कलागुणांचा विकास करता येईल. चारचौघांत कौतुकास पात्र व्हाल. जुन्या मित्रांच्या संपर्कात याल. सामाजिक कामात पुढाकार घ्याल.
कन्या :-
सामाजिक दर्जा सुधारता येईल. तुमचे अस्तित्व इतरांना दाखवून द्याल. अधिकार वाढीसाठी प्रयत्न कराल. महत्त्वाची सरकारी कामे पुढे सरकतील. गोड बोलून कामे साध्य करता येतील.
तूळ :-
आपल्या वागणुकीने आदर्श निर्माण कराल. मान टिकवण्यासाठी प्रयत्नशील राहाल. राजकारणी धोरण आजमावून पहाल. आत्मबळाने वाटचाल करावी. पित्त विकाराचा त्रास जाणवेल.
वृश्चिक :-
काही कामे उगाचच वेळ घेतील. क्षुल्लक अपयशाने खचून जाऊ नका. योग्य संधीची वाट पहावी लागेल. काही धाडसी निर्णय घ्यावे लागतील. आत्मचिंतन करावे लागेल.
धनू :-
जोडीदाराशी बोलताना मतभिन्नता वाढू शकते. त्याच्या मानी स्वभावाचा अचंबा वाटेल. नवीन लोक संपर्कात येतील. व्यवहारी दृष्टीकोन ठेवून वागावे लागेल. घरगुती कामात गुंतून पडाल.
मकर :-
कामात वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. आर्थिक गोष्टीत कौटुंबिक सहकार्य घ्यावे. मनातील इच्छेला मुरड घालून पहावी. अधिकारांचा योग्य ठिकाणी वापर करावा. कामाचा उरक वाढवावा लागेल.
कुंभ :-
बौद्धिक दिमाख दाखवाल. उपासनेत प्रगती करता येईल. स्पर्धेत भाग घ्याल. एककल्ली विचार करू नका. दूरच्या प्रवासात काळजी घ्यावी.
मीन :-
मन:शांती जपावी लागेल. फार चिडचिड करू नका. काही गोष्टी शांततेच्या मार्गाने सोडवाव्यात. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. शांत व संयमी विचार करावा.
हेही वाचलंत का ?
- शासकीय ज्वारी खरेदीत वर्षानुवर्षे शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्यांना पुर्णविराम लागण्यासाठी आवश्यक ते नियोजन करूनच खरेदी सुरू करा…आ.अमोलदादा पाटील
- एका वयस्कर व्यक्तीस अंघोळ करताना नग्नावस्थेतील तरुणीच्या व्हिडीओ कॉल आला मग….. ब्लॅकमेलिंग करून 14 लाख 66 हजार उकळले,काय आहे प्रकरण वाचा.
- गुगलच्या मदतीने बनविलेले विषारी फुलांचे ज्यूस पाजून सैतान मुख्याध्यापिका पत्नीनं शिक्षक पतीला संपवलं; विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह पण……
- ३ लाख २५ हजार रुपयांचे सोन्याचे दागीने आणि रोख रक्कमेची घरफोडी करणाऱ्या चोरट्यास मेहूणबारे पोलिसांनी केले जेरबंद.
- सासूने घेतला चोरीचा आरोप कंटाळून महिलेने आत्महत्या करण्यासाठी कालव्यात मारली उडी वाचवण्यासाठी हवालदार धावला; महिला वाचली पण हवालदाराने जीव गमावला.