भडगाव प्रतिनिधी
भडगाव :- येथील वेद अकॅडमीच्या संचलिका व
नॅशनल युथ कॉन्सिल ऑफ इंडियाच्या जळगाव जिल्हा समन्वयक नेहा मालपूरे यांच्या संकल्पनेतुन विज्ञान दिनानिमित्ताने वेद अकॅडमी आयोजीत कॉफी विथ यंग सायन्स इनथ्यूझ़ीअस्ट या साप्ताहिक उपक्रम नॅशनल युथ कॉन्सिल ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने आज पार पडला. या विज्ञान सप्ताहाची सांगता प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठातील भौतिकशास्र विभाग प्रमुख डॉ जयदीप साळी सर यांच्या मार्गदर्शनाने झाली. तर प्रमुख अतिथी म्हणून नॅशनल युथ कॉन्सिल ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अॅड राहुल वाकलकर होते. प्रसंगी उपक्रमाचे उद्घाटक प्रा डॉ दिपक मराठे, नॅशनल युथ कॉन्सिल ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्याध्यक्ष प्रशांत गुरव, जळगाव जिल्हाध्यक्ष अनिल बाविस्कर आदी उपस्थित होते.
भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात गेल्या ७५ वर्षाचा विज्ञान व तंत्रज्ञान इतिहास आणि विज्ञान प्रचार, प्रसार व्हावा या ऊद्देशाने राष्ट्रीय विज्ञान दिनाची या वर्षाची थीम “शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानामध्ये एकात्मिक दृष्टिकोन” होती. याच अनुशंगाने मानवाच्या निर्मीतीपासुन आजचा माणूस, झालेली प्रगती, त्याच्या मूलभूत गरजांमधे अन्न, वस्र, निवारासोबत ऊर्जा आणि नेटवर्क या देखील मूलभूत गरजा झाल्या आहेत. तसेच भविष्यात शाश्वत विकासासाठी 3R अर्थात Reuse, Reduse आणि Recycle याचे महत्व जयदीप साळी यांनी मुलांना सांगितले.
या विज्ञान सप्ताहात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ साइंस एजुकेशन अँड रिसर्च पुणे येथील सोनल थोरवे यांनी “विश्वातील आपला पत्ता”, सचिन पाटील यांनी “चला विज्ञानाच्या प्रेमात पडुया”, अविनाश जावळे यांनी “तुम्ही, मी आणि गणित”, गोपाल वाघ यांनी “आवाजाविषयी सर्वकाही”, निलेश जाधव यांनी “प्रकाशाचा खेळ” आणि नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे येथील चंदन महाजन यांनी “सौरऊर्जा – प्रगतीचा एक महामार्ग” अशा विविध विषयांवर युवा संशोधक व अभ्यासकांनी गप्पा झाल्या व अगदी सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.
आजच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वेद अकॅडमीच्या नेहा मालपूरे यांनी व आभार यामिनी पाटील यांनी मानले. सदर उपक्रम यशस्वीतेसाठी नि:स्वार्थ प्रतिष्ठानचे अविनाश जावळे, नॅशनल युथ कॉन्सिल ऑफ इंडियाचे ओंकार शेटे, कविता शिंदे, गणेश नकाते, पूजा पाटील, धनश्री ठाकरे, अभिषेक वायाळ, प्रियांशू भदाणे आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य व जळगाव सदस्य तसेच सर्व शाळांचे सहकार्य लाभले.