आग्रा (उत्तर प्रदेश):- येथे एका हिंदू मुलीच्या धर्मांतराची तयारी सुरु होती. एका अल्पवयीन हिंदू मुलीचा विवाह मुस्लिम तरुणाशी होणार होता.मौलवीची वाट पाहिली जात होती. लग्नाची सर्व तयारीही पूर्ण झाली होती.
मात्र त्यापूर्वीच पोलीसांनी घटनास्थळ पोहोचून या जोडप्याला पकडले. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी करुन कारवाई करण्यासंबंधी सांगितले आहे.
दरम्यान, एतमाउदुल्ला पोलिस स्टेशनच्या प्रकाश नगरमध्ये, पोलिसांना स्थानिक लोकांकडून माहिती मिळाली की, एक मुस्लिम तरुण एका अल्पवयीन हिंदू मुलीशी लग्न करत आहे.
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांना एका घरात एक मुलगी आणि एक मुस्लिम तरुण बसलेले आढळले.
मुलीचे नाव बदलले…
दोघेही मौलवीची वाट पाहत होते. पोलिसांच्या चौकशीत मुलीने तिचे खरे नाव रचना असल्याचे सांगितले. मुस्लिम तरुण साहिलने तिचे नाव बदलून रुखसार ठेवले होते.
तो मूळचा अलीगढचा रहिवासी आहे. साहिल नोएडामध्ये एका फॅक्टरीत काम करत होता. सहा महिन्यांपूर्वीच रचनाची साहिलशी ओळख झाली होती. तीन महिन्यांपूर्वी ती साहिलसोबत राहायला सुद्धा गेली होती.
दुसरीकडे, धर्म बदलून साहिलने तिच्याशी लग्न करण्याचा बेत आखला होता. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी त्याला पकडले. डीसीपी सिटी विकास कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाची चौकशी सुरु आहे.
तीन महिन्यांपूर्वी नोएडामध्ये अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. आरोपी तरुण तीन महिन्यांपासून तिच्यासोबत नोएडा येथून पळून गेला होता. येथून ते पहिल्यांदा ग्वाल्हेरला गेले नंतर ते आग्र्याला आले.
हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली…
गेल्या शुक्रवारी तो धर्मांतर करुन लग्न करणार होता. रचनाच्या म्हणण्यानुसार, साहिलने तिला केवळ मांसाहारच करायचा शिकवले नाही तर तिचे नाव बदलून रुखसार ठेवले होते.
डीसीपी सिटी विकास कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोएडा येथील पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी हरवल्याची तक्रार दाखल केली होती.
या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. जे काही तथ्य समोर येईल, त्यानुसार कारवाई केली जाईल. सध्या मुलीला नोएडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबाबत नातेवाईकांनाही कळवण्यात आले आहे.
हे पण वाचा
- Viral Video: एक तरुण स्टंटबाजी करण्यासाठी धावत्या लोकल ट्रेनच्या छतावर चढला अन् अचानक पुढं भयंकर घडलं; पहा व्हिडिओ
- रस्त्यावरील विजेचा खांब बाजुला करा,या मागणीसाठी एका नागरिकाने चक्क विजेचा खांबावरच खाट बांधून केले उपोषण
- अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्यांच्या खून करणाऱ्या आई व तिच्या प्रियकरास जन्मठेप.
- “माझा मृत्यू माझ्या पत्नीच्या छळामुळे झाला” असे माझ्या शवपेटीवर लिहा ही माझी शेवटची इच्छा आहे अशी सुसाईट नोट लिहून तरुणाने केली आत्महत्या.
- एक तरुण नोकरी गेल्याने निराश होऊन कंटाळून आपल्या देशात येण्यासाठी निघाला अचानक त्याच्या नशिबाची बंद कवाडे उघडली अन् तो झाला 13 कोटींचा मालक