पारोळा :- पोलीस स्टेशन हद्दीतील जोगलखेडा शेत शिवारातील शेतकरी मनोज रवींद्र पाटील यांची शेतातील विहरी मधील पाण्याची मोटर चोरी करीत असताना आरोपी नामे प्रकाश पिरचंद दायमा वय 65 वर्ष रा धुळे हमाल मापाडी प्लॉट,हा त्यांना त्यांचे विहरितील मोटर चोरताना दिसून आलेने फिर्यादी व त्याचे मित्राने पकडुन पारोळा पोलिसांना कळविले, फिर्यादीचे फिर्याद वरून चोरीचा प्रयत्न केले बाबत गुन्हा दाखल करण्यात आला
असून,नमूद आरोपी जवळ ब्लेड कटर, पाने,टॉर्च ,स्क्रू ड्रायव्हर असे चोरी करणे करीता चे साधन मिळून आले आहे,नमूद आरोपीस मा JMFC काझी साहेबा समक्ष हजर केले असता नमूद आरोपीचा मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड करण्यात आला आहे, नमुद गून्हाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली पो को प्रदीप पाटील करीत आहे.
हे पण वाचा
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.






