कासोदा प्रतिनिधी
कासोदा येथे सालाबादाप्रमाणे यावर्षीही कासोड द्यात जयभोले चालक – मालक संघटनेच्या वतीने महाशिवरात्री निमित्ताने साबुदाणे खिचडी व चाय पान चे वाटप करण्यात आले.
कासोद्यातील एरंडोल – भडगाव रस्त्यावरील श्री महेश मंदिर येथे दि. १ मार्च २०२२ मंगळवार रोजी महाशिवरात्रीच्या या शुभपर्वावर चालक मालक संघटने तर्फे यावर्षी ही ३ क्विंटल साबुदाणे दिड क्विंटल बटाटे , एक क्विंटल शेंगदाणे कूट ने बनवली सर्वात्कृष्ठ साबुदाणे खिचडी , व चाय चे ह्या रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांमधील , महिला- पुरुष यासर्वांना ह्या चालक मालक ग्रुप ने गाडी थांबवून प्रसादाचे वाटप केले .
याप्रसंगी दरवर्षीप्रमाणे जय भोले चालक मालक संघटना जय भोले ग्रुपचे सर्व ४०७ गाडी , पिकअप , ओम्नी व मालवाहू गाडीचे चालक – मालक तथा महेश मंदिर परिसरातीलच छोटे- मोठे व्यापारी दुकानदार तथा गावांतील काही ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित असतात सर्वजण हिरिरीने सहभागी होतात ,
जय भोले ग्रुपतर्फे दरवर्षी होत असलेल्या या उल्लेखनीय कामगिरी ने सर्वत्र त्यांचे कौतुक करण्यात येत आहे…!