What is the benefits of jaggery and chickpeas? हृदय राहील निरोगी – हाडांना मिळेल मजबुती, फक्त रोज सकाळी मुठभर चणे – गुळ खायला विसरू नका..
शरीर सुदृढ व मजबूत राहण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. आरोग्य उत्तम राहण्यासाठी नियमित व्यायाम व योग्य आहाराचे सेवन करणे गरजेचं आहे. असे अनेक पदार्थ आहेत, ज्याच्या सेवनाने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. आजकालच्या बैठी जीवनशैली व लोकांच्या आळशीपणामुळे लोकांमध्ये पूर्वीसारखी उर्जा व ताकद राहिलेली नाही. लगेचच थकवा येतो. थोडं काम केल्यानंतर थकवा का येतो? याचा विचार आपण कधी केला आहे का? थकवा घालवण्यासाठी आपण चणे व गुळाचे सेवन करू शकता.
चणे कॅल्शियम आणि फायबरने समृद्ध असतात, तर गूळ लोह आणि पोटॅशियमसारख्या घटकांचा उत्तम स्रोत मानला जातो. तज्ज्ञांच्या मते, या दोन गोष्टींच्या नियमित सेवनाने अनेक आजार टाळता येतात. चणा व गुळाच्या सेवनाने आरोग्याला कोणते फायदे मिळतात, याबाबतीत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे आहारतज्ज्ञ रोहित यादव यांनी माहिती दिली आहे
गुळ – चणे खाण्याचे ५ भन्नाट फायदे

हाडे मजबूत होतात
शरीरातील हाडे मजबूत करण्यासाठी गुळ आणि चणे खाण्याचा सल्ला मिळतो. चण्यामध्ये आढळणारे कॅल्शियम हाडे मजबूत करण्यास मदत करतात. तिशीत हाडे ठिसूळ होतात, असे होऊ नये म्हणून गुळ – चणे खा. याचे नियमित सेवन केल्याने हाडांसह इतरही आजार दूर होतात.
हृदय निरोगी राहते

हृदय निरोगी ठेवण्यासाठी गुळ – चणे उपयुक्त ठरते. गुळ – चण्यामध्ये आढळणारे पोषक तत्व हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी करतात. तज्ज्ञही ते खाण्याचा सल्ला देतात.
वजन कमी करते

चण्यामध्ये प्रोटीन आढळते. गुळ – चणे खाल्ल्याने पोट भरलेले राहते. ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. आपण सकाळी गुळ – चणा खाऊ शकता.
पचनशक्ती वाढवते.

चणे आणि गूळ पचनशक्ती निरोगी ठेवण्यास मदत करते. या दोन गोष्टी खाल्ल्याने पोटाला आराम मिळतो. या दोन्ही गोष्टी समान प्रमाणात खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
अॅनिमियावर उपाय

अनेक समस्यांमुळे शरीरात रक्ताची कमतरता भासू शकते. अशा परिस्थितीत नियमित चणे आणि गुळ खा. चणे आणि गुळामध्ये लोह पुरेशा प्रमाणात आढळते. ज्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते.
हे वाचलंत का ?
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.






