भोले सरकार मित्र परिवाराच्यावती ने महाशिवरात्री निमित्ताने विविध कार्यक्रम.

Spread the love

धरणगाव प्रतिनिधी:- योगेश पाटील

धरणगाव प्रतिनिधी:- (योगेश पाटील) धरणगाव शहरात आज महाशिवरात्री निमित्ताने भोले सरकार मित्र परिवाराच्यावतीने व सर्व शिव भक्तांच्या सहकार्याने सकाळ पासून विविध कार्यक्रम घेण्यात येत असून सदरील कार्यक्रमात तरुणांचा मोठया प्रमाणात सहभाग दिसून येत आहे.


महाशिवरात्री निमित्ताने आज भोले सरकार मित्र मंडळा कडून सकाळी ५:०० वा. महाआरती करण्यात आली व १०:०० वा. पासून भक्तांना फराळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्याच प्रमाणे सायं.७:३० वा. सामूहिक शिवतांडाव स्तोत्र पठणाचा आनंद सर्व शिव भक्तांनी घेऊन मध्यरात्री १२:०० वा. शिव-पार्वती विवाह सोहळा व महाआरती होणार आहे तरी सर्व शिवभक्तानी याचा लाभ घ्यावा असे कळविण्यात आले आहे.

तत्पूर्वी भोले सरकार मित्र मंडळा तर्फे शिव शंकराची प्रतिकात्मक व्यक्तीरेखा साकारून नंदी वर बसून शहरातील मुख्य रस्त्यांवरून वाजत-गाजत मिरवणूक काढत शहरातील जागृत असलेले सारजेश्वर महादेव मंदिरात मिरवणूक संपन्न करण्यात आली. त्या नंतर रात्री भाविक भक्तांसाठी ठीक ८:००वा भजन संध्या कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला असून त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन मंडळा तर्फे करण्यात आले आहे.


या प्रसंगी मित्र मंडळातील सर्व कार्यकर्ते व शिवभक्तांनी अनमोल सहकार्य करीत कार्यक्रम संपन्न करण्यात आला.

टीम झुंजार