धरणगाव प्रतिनिधी:-योगेश पाटील
धरणगाव प्रतिनिधी:-(योगेश पाटील) शहरातील प्रभाग क्र.२ संजय नगर येथे जागृत महादेव मंदिर असून नवसाला पावणारा महादेव म्हणून या मंदिराची ख्याती अवघ्या पंचक्रोशीत प्रचलित आहे.
त्या अनुषंगाने संजय नगर येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊसो.बापू महाजन यांनी आपल्या स्वखर्चाने महाशिवरात्री निमित्ताने शहरातील सर्व भाविक भक्तांसाठी फराळ वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता.
या प्रसंगी धरणगाव शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख मा.श्री.गुलाबरावजी वाघ यांच्या शुभहस्ते सर्व प्रथम महादेव मंदिरात पूजन करून उपस्थित शिवभक्तांना फराळ वाटप करण्यात आला.
या मंगलमयी कार्यक्रमा प्रसंगी प्रभाग क्र.२ चे नगरसेवक मा.सुरेश महाजन, विजय महाजन, कृपाराम महाजन,गोपाल महाजन,बापू चौधरी, भगवान महाजन,बापू पाटील,दत्तू महाजन, रामकृष्ण महाजन, मच्छिंद्र चौधरी,भगवान महाजन,भैय्या महाजन,विजय महाजन,साहेबराव महाजन,आत्माराम महाजन,अनिल महाजन, समाधान महाजन,विजय निकम,किरण महाजन,विकी महाजन व जय भोले मित्र परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.त्याच प्रमाणे संजय नगर मधील महिला भगिनी सुद्धा या वेळी आवर्जून उपस्थित होत्या हे विशेषतः जाणवत होते.
सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय नगर येथील जय भोले मित्र मंडळ व संजय नगर परिसरातील सर्व नागरिक व बंधू-भगिनी यांनी परिश्रम घेतले.