मुंबई l प्रतिनिधी :- अस्लम चोगले राहणार श्रीवर्धन जि रत्नागिरी ( कोकण ) येथील रहिवासी यांना मागील एका वर्षा पासून सतत पोटदुखी चा त्रास सतावत होता. त्यांनी अनेक प्रायव्हेट गव्हर्मेंट हॉस्पिटल जाऊन सर्व रिपोर्ट केले तरी त्यांना त्यांचे निदान मिळत नव्हते. श्रीवर्धन मधील स्थानिक त्यांच्या गावातील सोशल ऍक्टिव्हिटी करणारे आसिफ नूर हसन यांच्याशी संपर्क केला .तेंव्हा त्यांच्या संपर्क मधील आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशन चे अध्यक्ष श्री. जितेंद्र पाटील सर यांच्याशी संपर्क करून दिला.
श्री जितेंद्र पाटील यांनी तात्काळ त्यांचे रिपोर्ट व्हाट्सअप द्वारे मागून घेतले. आणि त्यांना दुसऱ्या दिवशी नवी मुंबई मधील एका प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करण्याचे सांगितले. असलम चोगले यांना ऍडमिट केल्यानंतर त्यांचे सर्व रिपोर्ट्स नवीन काढण्यात आले. त्या रिपोर्ट मध्ये त्यांना अनेक प्रकारचे आजार आहे असे दिसून आले. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार त्यांना 25 दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले होते. पोटामध्ये त्यांना खूपच इन्फेक्शन झाले होते. व प्रोस्टेड आणि मुतखडा याचे ने सुद्धा त्यांना खूप त्रास होत होता.
असलम चौगुले यांना 25 दिवसांपर्यंत उपचार झाल्यानंतर . आणि त्यांचे सर्व निदान झाल्यावर हॉस्पिटल मधून त्यांचा रिचार्ज करण्यात आला. आणि हॉस्पिटल मधून त्यांना कुठलाही एक रुपया न घेता पूर्ण पणे मोफत उपचार करण्यात आले. यानंतर अस्लम चोगले यांनी आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन चे अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील सरांचे आभार व्यक्त केले.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य रविवार दि. २४ नोहेंबर २०२४
- जळगाव ग्रामीण मतदार संघातून शिवसेना महायुतीचे गुलाबराव पाटील यांच्या दणदणीत विजय.
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन