Viral Video: मॉर्निग वॉकला निघालेल्या तीन महिलांना भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने चिरडलं; भीषण अपघाताचा व्हिडिओ व्हायरल

Spread the love

Viral Video: तेलंगणात एक भीषण अपघात झाला आहे. प्रचंड वेगात असणाऱ्या एका कारने मॉर्निक वॉकला निघालेल्या तिघींना जोरदार धडक दिली. या अपघातात दोन महिला आणि एक लहान मुलगा ठार झाले असून दोन जण जखमी झाले आहेत.त्यांची प्रकृती सध्या गंभीर असून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

शहराच्या बाहेरील बांदलागुडा जहागीर येथील सन सिटीजवळ सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अपघातात मृत्यू झालेल्या महिलांची नावं अनुराधा आणि ममता आहेत. या दोघी आई आणि मुलगी होत्या. तर कविता नावाची एक महिला आणि इन्तिकाब आलम नावाचा तरुण जखमी आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

व्हिडीओत काय दिसत आहे?…

व्हिडीओत दिसत आहे त्यानुसार, तीन महिला रस्त्याच्या कडेने चालताना दिसत आहे. यानंतर काही वेळातच मागून वायूवेगाने येणारी कार त्यांना उडवते. कार इतकी वेगात होती की काही सेकंदात तरुणी अक्षरश: दिसेनाशा झाल्या. तिथे फक्त धूर आणि धूळ दिसत होती. यावरुनच अपघात किती भीषण होता याची कल्पना येते.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कार अत्यंत वेगाने आणि बेदरकारपणे चालवली जात होती. यामुळेच हा अपघात झाला आहे. दरम्यान, मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलांना धडक दिल्यानंतर कार रस्त्यावरुन खाली उतरली आणि झाडावर जाऊन आदळली. अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला.

https://twitter.com/Telugu_Flix/status/1676159250270404608?ref_src=twsrc

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठलं. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. पोलीस सध्या कारमालकाचा आणि वाहन चालवणाऱ्याचा शोध घेत आहेत.
दरम्यान दुसर्‍या एका घटनेत, सोमवारी रात्री कुकटपल्ली भागात एका खासगी बसने कार आणि दुचाकीला धडक दिली. या घटनेत एक जण जखमी झाला आहे. बसचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाला.

https://twitter.com/Telugu_Flix/status/1676159250270404608?ref_src


टीम झुंजार