ठाकरे गटाला आणखी एक धक्का, निलम गोऱ्हेंचा शिवसेना प्रवेश , प्रवेशावर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया.

Spread the love

मुंबई : – सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे अश्यातच शिवसेना ठाकरे गटाला गळती सुरूच आहे. आज विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी शिवसेनेते प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यांवर निशाणा साधला आहे. दरम्यान निलम गोऱ्हे यांच्या पक्षप्रेवेशावर ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी निलम गोऱ्हे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

निलम ताईंना 4 वेळा विधान परिषदेची उमेदवारी दिली. उपसभापतीपद दिलं. त्यांनी चार टर्म आमदारकी उपभोगली. मी याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो. आज शिवसैनिकांना किती यातना होत असतील. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत लाखो जण उभे आहेत. स्वार्थी लोक गेले तर फरक पडत नाही. पक्षाला दगा देणं किंवा वार करणं त्यांना शोभत नाही. त्यांना मिळालेली आश्वासने पूर्ण व्हावीत, असं परब यांनी म्हटलं आहे.

निलम गोऱ्हे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बोलतना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, निलम गोऱ्हे यांचा शिवसेनेतील प्रवेश हा ऐतिहासिक आहे. आता निलम गोऱ्हे यांना मनासारंख काम करता येईल, अन्यायाविरोधात वाचा फोडता येतील.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार