विनाहुंडा आदर्श विवाहाच्या परंपरंपरेचा पायंडा,समाजातील अनुकरणीय परंपरेचा श्रीगणेशा

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी
भातखेडे तालुका एरंडोल येथील रहिवासी श्री.सुभाष रामदास पाटील यांचे चिरंजीव योगेश व संजय आनंदा पाटील राहणार हातनुर ता सिंदखेडा जि धुळे यांची कन्या आश्विनी संजय पाटील यांचा शुभ विवाह समारंभ दि.17 फेब्रुवारी 2021 गुरूवार रोजी अत्यंत उत्साहात संपन्न झाला.


मराठा कुणबी समाजातील एक आदर्श विवाह म्हणून या विवाहाचे सर्वत्र कौतुक होत आहे.वर व वधू कडील दोन्ही परिवारांनी सर्वसंमतीने “विनाहुंडा विवाह” करण्याचा संकल्प केला व तो पूर्ण ही केला.दोन्ही परिवाराचा हा संकल्प मराठा- कुणबी समाजातील आदर्श परंपरेचा श्रीगणेशा मानला जात आहे. हा विवाह सोहळा विना हुंडा घडवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले ते खान्देश मराठा कुणबी वधुवर परिचय ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष,समाजभूषण पुरस्कार प्राप्त बापूसाहेब सुमित पाटील यांनी ही परंपराच समाजात निर्माण व्हावी यासाठी नवीन पायंडा म्हणून निश्चितच सर्वांसाठी अनुकरणीय असल्याचे म्हटले आहे. हि परंपरा सर्वमान्य होत असल्याचा मला अभिमान आहे असेही ते नमूद करतात.बिनाहुंडा विवाह हि काळाची गरज असून या पद्धतीचे अनुकरण समाजातील सर्वच लहान-मोठे, श्रीमंत व गरीब परिवारांनी करावे असे आवाहन बापूसाहेब सुमित पाटील व त्यांच्या ग्रुपमधील सर्व सहकाऱ्यांनी केले आहे.हा विनाहुंडा विवाह जुळवण्यासाठी नानासाहेब किशोर एम.पाटील खडगावकर
उपाध्यक्ष संस्थापक मराठा वधुवर परिचय संस्था,जळगाव यांचे देखील सहकार्य लाभले.

टीम झुंजार