Viral Video : सोशल मीडिया वापरताना आपल्याला रोज कोणता कोणता व्हिडीओ दिसतो. स्क्रोल करताना असाच एक व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. हा व्हिडीओ एका लग्नातला असून वधुच्या कृतीमुळे सर्वच जण आवाक् झाले आहेत.
शक्यतो लग्नामध्ये वधु मान खाली घालून असते असं आपण पाहतो. पण व्हायरल व्हिडीओतील वधु एकदम बिनधास्त अंदाजात होती. तर वर शरमेने मान खाली घालून झुकल्याचं दिसत आहे. वरमाळा विधीत वधुने तर कहरच केला. वराच्या गळ्यात वरमाळा घालण्यापूर्वीच वराच्या गाळावर चुंबन घेतलं. त्यामुळे वराला लाजल्यासारखं झालं.
काय आहे व्हिडीओमध्ये…
व्हायरल व्हिडीओत आपण पाहू शकता की, वधु आणि वर दिसत आहे. वरमाळा घालण्याचा विधी सुरु होतो. तेव्हा वराच्या गळ्यात माळ घालण्यापूर्वी त्याच्या गाळावर चुंबन घेते. यावेळी वराचा फेटा बाजूला होतो. तेव्हा उपस्थिती वऱ्हाडीपैकी एक जण फेटा व्यवस्थित करतो. त्यानंतर वर वधुच्या गळ्यात वरमाळा घातलो. @memecentral.teb या इंस्टाग्राम खात्यावरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओखाली नेटकरी आपल्या अंदाजात कमेंट्स देत आहेत. काही सेकंदातच या व्हिडीओला हजारो लाईक्स मिळाल्या आहेत. एका युजर्सने लिहिलं आहे की, ‘लग्नात असे प्रकार भविष्यात पाहायला मिळाले तर आश्चर्य वाटायला नको.’ दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, ‘लग्नापूर्वी असं काही करण्याची आवश्यकता नाही.
हे पण वाचा
- लग्न होत नाही म्हणून एजेंटला दिले 5 लाख रुपये, सोन दिल लग्न लागलं अन् दुसऱ्याच दिवशी नवरी फरार, 5 जणांन विरोधात गुन्हा दाखल.
- उसनवार दिलेले अडीच लाख रुपये दे, किंवा माझ्याशी लग्न कर असा तगादा लावणाऱ्या महिलेच्या मित्रांने केली हत्या.
- जळगाव एमआयडीसी पोलिसांनी अट्टल दुचाकी चोरास केले जेरबंद; साडे सात लाखांच्या 15 मोटरसायकली जप्त
- आमदार अमोलदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित प्रा.वसंत हंकारे यांच्या एरंडोल येथील व्याख्यानास उत्स्फूर्त प्रतिसाद
- पारोळा बायपास महामार्गावर गॅसचा टँकर कलंडला:.…..प्रशासनाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला…..