भारतीय आहारच सर्वाेत्तम, आराेग्यदायी पदार्थांमध्ये दूध व दुधापासून बनविलेल्या इतर पदार्थांचाही आता समावेश करण्यात आला आहे.
लाॅस ॲंजेलिस : भारतीयांच्या जेवणात दूध, लाेणी, तूप, ताक आणि दही हे पदार्थ हमखास असतात. या पदार्थांच्या सेवनाचे अनेक फायदे आहेत. मात्र, हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी दुधापासून बनलेले हे पदार्थ उपायुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. आहारात त्यांचा मर्यादित समावेश हृदयासाठी चांगला असल्याचे एका संशाेधनात आढळले आहे. युराेपियन हार्ट जर्नलमध्ये ते प्रसिद्ध झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे, जास्त चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांचे सेवन टाळावे, या आतापर्यंतच्या धारणेला हे संशाेधन आव्हान देत आहे.
दूध, लाेणी आणि तूप यांचे जास्त प्रमाणात सेवन आराेग्यासाठी चांगले मानले जात नाही. यापदार्थांमध्ये चरबी असते. मात्र, या संशाेधनात आढळले आहे, की याेग्य प्रमाणात यांचे सेवन हृदयाच्या आराेग्यासाठी लाभदायी आहे. आराेग्यदायी पदार्थांमध्ये दूध व दुधापासून बनविलेल्या इतर पदार्थांचाही आता समावेश करण्यात आला आहे.
या पदार्थांचाही समावेश.
हृदयासाठी उपयुक्त असलेल्या पदार्थांमध्ये फळे, हिरव्या भाज्या, सुवा मेवा आणि डाळी.
किती प्रमाणात सेवन उपयुक्त?
फळे – २-३ दरराेजभाज्या : २ ते ३ वाट्या दरराेजडाळ – ३ ते ४ वाट्या दरराेजसुका मेवा – ७ वाट्या आठवडाभरातदूध व दुग्धजन्य पदार्थ – २ वाट्या दरराेज (लाेणी किंवा सायीचे प्रमाण कमी असावे.)भरड धान्य – १ वाटी दरराेज.
हे मृत्यू पाेषक आहाराच्या कमतरतेमुळे हाेत असल्याचे संशाेधनात आढळले आहे. भारतीय आहारात वरण, तू, भात, ताक, दही, भाज्या तसेच फळांचा समावेश असताे. हाच आहार सर्वाेत्तम असल्याचे या संशाेधानातून सिद्ध झाले आहे.
हे वाचलंत का ?
- Viral Video: एक तरुण स्टंटबाजी करण्यासाठी धावत्या लोकल ट्रेनच्या छतावर चढला अन् अचानक पुढं भयंकर घडलं; पहा व्हिडिओ
- रस्त्यावरील विजेचा खांब बाजुला करा,या मागणीसाठी एका नागरिकाने चक्क विजेचा खांबावरच खाट बांधून केले उपोषण
- अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्यांच्या खून करणाऱ्या आई व तिच्या प्रियकरास जन्मठेप.
- “माझा मृत्यू माझ्या पत्नीच्या छळामुळे झाला” असे माझ्या शवपेटीवर लिहा ही माझी शेवटची इच्छा आहे अशी सुसाईट नोट लिहून तरुणाने केली आत्महत्या.
- एक तरुण नोकरी गेल्याने निराश होऊन कंटाळून आपल्या देशात येण्यासाठी निघाला अचानक त्याच्या नशिबाची बंद कवाडे उघडली अन् तो झाला 13 कोटींचा मालक