प्रतिनिधी l पाचोरा :- शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका 19 वर्षीय नवविवाहित तरुणीने राहत्या घरानजीक असलेल्या विहिरीत उडी मारून आपली जीवन यात्रा संपवली.
काजल राहुल चव्हाण असं मृत विवाहितेचं नाव असून तीन महिन्यापूर्वीचं प्रेम विवाह केला होता. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून याबाबत प्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून विवाहितेस सासरच्या मंडळींकडून मानसिक त्रास होत असल्यानेच विवाहितेने आत्महत्या केली असल्याचा आरोप करत पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
नेमकी घटना काय?…
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड तांडा येथील रहिवाशी राहुल चव्हाण याचा प्रेमविवाह लिहा तांडा ता. जामनेर येथील काजल राठोड हिच्याशी तीन महिन्यांपूर्वी झाला होता. लग्नानंतर काही दिवस चांगली वागणूक मिळाल्यानंतर काजल हीस आजल सासु सुग्राबाई चव्हाण, सासु मुक्ताबाई चव्हाण, चुलत सासु पार्वतीबाई चव्हाण ह्या किरकोळ कारणावरून टोचुन बोलत असल्याने त्यांच्यात वाद सुरू होते.
सतत होणाऱ्या भांडणामुळे राहुल चव्हाण हा १० जुलै रोजी काजल सोबत पाचोरा येथील गोविंद नगर भागात भाड्याची खोली घेऊन राहायला आला होता.
दरम्यान १३ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास काजल हिने टोकाचे पाऊल उचलत घराच्या मागच्या बाजूला असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करत आपली जीवन यात्रा संपवली.काजल हिच्या आईसह माहेरच्या मंडळींनी एकच आक्रोश करत सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून काजल हिने आत्महत्या केल्याचे बोलुन दाखविले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.
हे पण वाचा
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.