मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सन २०१९-२०, २०२०-२१ आणि २०२१-२२ असे तीन वर्षांचे एकूण ११७ क्रीडा पुरस्कार क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी आज सेवासदन या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार सन २०१९-२० श्रीकांत शरदचंद्र वाड (ठाणे), सन २०२०-२१ दिलीप बळवंत वेंगसरकर आणि सन २०२१-२२ आदिल जहांगिर सुमारीवाला, (मुंबई) यांना जाहीर करण्यात आला आहे.
मंत्री श्री. महाजन म्हणाले की, राज्यात क्रीडा संस्कृतीचा वारसा जपला जाऊन त्याचे संवर्धन व्हावे, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या क्रीडा महर्षी, मार्गदर्शक, खेळाडूंच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येतात.
विविध पुरस्कार पुढीप्रमाणे:- शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार- २, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार मार्गदर्शक -१३, जिजामाता पुरस्कार (क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार)-१, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू)-८१ , शिवछत्रपती राज्य क्रीडा साहसी पुरस्कार -५, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू)-१४ असे एकूण ११७ पुरस्कार आहेत.
उपमुख्यमंत्री तसेच महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी केले अभिनंदन
क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्य शासनाचा ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झालेले श्रीकांत वाड, दिलीप वेंगसरकर, आदिल सुमारीवाला या मान्यवरांचं उपमुख्यमंत्री तसेच महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.
राज्य शासनाच्या वतीने दिले जाणारे उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती साहसी क्रीडा पुरस्कार, दिव्यांग बांधवांसाठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार आज क्रीडा क्षेत्रातील ११७ मान्यवरांना जाहीर झाले. या सर्व खेळाडू, प्रशिक्षक, मार्गदर्शकांचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या खेळाडूंनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडाक्षेत्रात महाराष्ट्राचा गौरव वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचं, दिलेल्या योगदानाचा महाराष्ट्राला अभिमान आहे. या खेळाडूंपासून प्रेरणा घेऊन राज्यातील युवक अधिकाधिक संख्येने खेळांकडे वळतील, क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करुन महाराष्ट्राचं अव्वल स्थान कायम राखतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य रविवार दि. २४ नोहेंबर २०२४
- जळगाव ग्रामीण मतदार संघातून शिवसेना महायुतीचे गुलाबराव पाटील यांच्या दणदणीत विजय.
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन