जळगाव रेल्वेस्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर घडलेली धक्कादायक घटना.
जळगाव VIDEO:- रेल्वेच्या विद्यूत वाहिनीजवळ जाऊ नका हे सांगूनही माथेफिरुनं ऐकलं नाही. माथेफिरुन मालगाडीवर चढत असताना त्याला विद्यूत शॉक लागला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
जळगाव रेल्वेस्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर एका माथेफिरु अनोळखी इसमाने थांबलेल्या रेल्वे मालवाहू रेल्वे गाडीवर उभे राहून विद्युत शॉक लागल्याने मृत्यू झाला. ही घटना रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मालवाहू रेल्वेच्या डब्यावर हा व्यक्ती चढत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
डब्यावर उभा राहिल्याने एका अनोळखी व्यक्तीचा रेल्वेच्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना घडल्यानंतर रेल्वे पोलीस ठाण्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अतिफ शहा यांनी तपासणी यांची मयत घोषित केले.
https://www.youtube.com/@zunjaarnews
Like share and Subscribe our youtube Channel
आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा ????
रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन केले असून नजीकच्या जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. या घटनेबाबत जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.