जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
भागीदारीतून अपेक्षित लाभ होईल. थोडीफार खरेदी केली जाईल. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. काही मनाजोग्या गोष्टी करता येतील. जोडीदाराचा उत्तम पाठिंबा मिळेल.
वृषभ :-
कलहकारक वातावरण टाळावे. गरजेच्या वस्तू खरेदी केल्या जातील. विरोधकांचा विरोध मावळेल. कामातून समाधान लाभेल. प्रलंबित कामे पूर्ण करू शकाल.
मिथुन :-
ठामपणे निर्णय घ्यावे लागतील. भावनिक ताण कमी करावा. बौद्धिक चर्चेत भाग घ्याल. आपल्याच मतावर अडून राहू नका. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील.
कर्क :-
जोडीदाराचे मत विचारात घ्या. गनिमी काव्याचा वापर कराल. हट्टीपणे वागाल. संयमाने काम साधावे लागेल. सामाजिक जाणीव ठेवावी लागेल.
सिंह :-
सकारात्मकता कमी पडू देऊ नका. तुमच्या इच्छाशक्तीची चांगली मदत मिळेल. मनावरील चिंतेचे मळभ दूर होईल. मुलांवरील विश्वास घट्ट होईल. उत्साहाने कामे तडीस न्याल.
कन्या :-
मतभेदाचे प्रसंग येऊ शकतात. तडजोडीला पर्याय नाही. संयम सोडून चालणार नाही. कौटुंबिक कामात लक्ष घालावे लागेल. आवडी-निवडी बाबत आग्रही राहाल.
तूळ :-
मनात विशिष्ट हेतू घेऊन काम कराल. दिवस धावपळीत जाईल. हातातील कामात यश येईल. आपल्या आवडत्या गोष्टीत रमून जाल. ऊर्जा आणि उत्साह वाढेल.
वृश्चिक :-
उत्तराला प्रत्युत्तर द्याल. हमालीची कामे करणे टाळावे लागेल. कर्जाची प्रकरणे हातावेगळी करावीत. शक्यतो कोणालाही उधार देऊ नका. बौद्धिक दिमाख दाखवाल.
धनू :-
माणसामाणसांतील फरक ओळखावा. दिवस कामाने व्यापलेला राहील. मनातील इच्छा पूर्ण होईल. आजचा दिवस अपेक्षित लाभ देणारा ठरेल. जुन्या गोष्टींनी त्रस्त होऊ नका.
मकर :-
कामाची रूपरेखा ठरवा. स्वावलंबन असणे आवश्यक आहे. दान-धर्म करण्याचा विचार कराल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. तुमच्या ज्ञानात भर पडेल.
कुंभ :-
इतरांच्या वागण्याचा फार विचार करू नका. धार्मिक गोष्टीत मन रमवा. विशाल दृष्टीकोन बाळगाल. नवीन मित्र जोडावेत. व्यावसायिक गोष्टीवर अधिक भर द्याल.
मीन :-
वाढीव कामे मागे लागू शकतात. खोट्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका. कोणताही व्यवहार करताना सावधानता बाळगावी. जबाबदारी टाळून चालणार नाही. आततायीपणा आड येऊ देऊ नका.
हेही वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






