भडगाव कासार समाजाच्या वतीने तहसिलदार यांच्या मार्फत राज्याच्या गृहमंत्र्यांना निवेदन.
भडगाव (प्रातिनिधी ) : – नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातीत निवघा येथील एका अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या ज्ञानेश्वर पवार उर्फ सोन्या याच्यावर पोक्सो अंतर्गत कारवाई करून फाशीची शिक्षा देण्यात यावी . या मागणीचे निवेदन भडगाव कासार समाजाच्या वतीने तहसिलदार यांच्या मार्फत राज्याच्या गृहमंत्र्यांना देण्यात आले .
निवघा येथील १७ वर्षीय मुलीने ज्ञानेश्वर पवार यांच्या सततच्या छेडछाडीला कंडाळून १२ जुलै रोजी विहरीत उडी घेऊन आत्महत्या केली . या घटनेचा भडगाव कासार समाजाच्या वतीने निषेध करत १७ जुलै रोजी भडगाव तहसिलदार मुकेश हिवाळे यांना निवेदन देण्यात आले . या गावगुंडांवर कठोर कारवाई करूण लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात कासार समाज्याच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला .
यावेळी भडगाव चे कासार समाज अध्यक्ष संजय बाजीराव कासार , उपअध्यक्ष सुनिल देविदास कासार , सचिव दिपक प्रकाश कासार , केशव मुरलीधर कासार , प्रमोद दत्तात्रय कासार , पुरुषोत्तम मुरलीधर कासार , सुनिल प्रभाकर कासार ,भास्कर अशोक कासार , स्वराज भास्कर कासार , मनोज धोंडू कासार , भगवान शांताराम कासार , उमेश देविदास कासार, अमोल देविदास कासार , प्रमोद सुखदेव कासार , कैलास वसंतराव कासार , गणेश पांडुरंग कासार हे उपस्थित होते .
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






