भाजपानं लोकसभा-विधानसभा निवडणुकांपूर्वी सगळे जिल्हाध्यक्ष बदलले,नवी टीम जाहीर.

Spread the love

जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी अमोल हरीभाऊ जावळे, ज्ञानेश्‍वर महाराज जळकेकर, जळगाव महानगराध्यक्षपदी उज्वला बेंडाळे यांची नियुक्ती.
मुंबई :- भारतीय जनता पार्टीच्या (BJP) संघटनात्मक रचनेतील महत्वपूर्ण दुवा असलेल्या जिल्हाध्यक्षांची नवी टीम जाहीर करत आहे. राज्यातील केंद्रीय नेतृत्व, राज्याचे नेतृत्व आणि प्रदेश कार्यकारिणीशी चर्चा करून ७० संघटनात्मक जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या धरतीवर आत्तापासून अनेक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे, त्याचाच एक भाग म्हणून भाजपाने मोठे खांदेपालट केली आहे. भाजपाने जिल्हा पातळीवर भाकरी फिरवली आहे. भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेतील महत्वपूर्ण दुवा असलेल्या जिल्हाध्यक्षांची नवी टीम जाहीर करत आहे. राज्यातील केंद्रीय नेतृत्व, राज्याचे नेतृत्व आणि प्रदेश कार्यकारिणीशी चर्चा करून ७० संघटनात्मक जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सर्वांना सोबत घेऊन पक्ष मजबूत करायचा आहे – बावनकुळे

दरम्यान, प्रदेश कार्यकारिणीशी चर्चा करून ७० संघटनात्मक जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. “मला खात्री आहे, माझे नवनियुक्त सहकारी पक्षासाठी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावतील. या सर्वच सहकाऱ्यांच्या सोबतीने 2024 च्या महाविजयासाठी आम्ही सज्ज होत आहोत. भाजपा नव्या भारताच्या उभारणीसाठी कटिबध्द आहे. पक्षाच्या बांधणीत कार्यकर्त्यांचे योगदान सर्वोच्च आहे. पक्षासाठी कार्यकर्ते सर्वस्व असून, त्यांच्या अविश्रांत कष्टामुळे पक्षाने आज नवी उंची गाठली आहे. नवनियुक्त सर्व जिल्हाध्यक्षांनी सर्वांना सोबत घेऊन पक्ष मजबूत करायचा आहे”, असं बावनकुळेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

जळगाव जिल्ह्यातील भाजपचे तीन जिल्हाध्यक्ष जाहीर, तिन्ही तरूण चेहर्‍यांना संधी
भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षांची निवड लवकरच जाहीर होणार असल्याचे संकेत कधीपासूनच मिळाले होते.आज अखेर पक्षातर्फे तीन जिल्हाध्यक्ष जाहीर केले आहेत. यात रावेर लोकसभेच्या जिल्हाध्यक्षपदी अमोल हरीभाऊ जावळे, जळगाव लोकसभेच्या जिल्हाध्यक्षपदी ज्ञानेश्‍वर महाराज जळकेकर तर जळगाव महानगराध्यक्षपदी नगरसेविका उज्वला बेंडाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही निवड जाहीर केली आहे.

भारतीय जनता पक्षाने पक्षाध्यक्षपदांसाठी तरूण चेहर्‍यांना संधी दिली आहे. अमोल हरीभाऊ जावळे यांना आधी विधानसभा क्षेत्रप्रमुखपदावर नियुक्त करण्यात आले होते. याच्या पाठोपाठ त्यांना जिल्हाध्यक्ष करण्यात आले आहे. ज्ञानेश्‍वर महाराज जळकेकर हे पक्षाचे फायरब्रँड नेते असून त्यांना बढती मिळालेली आहे. तर जळगाव महानगराध्यक्षपदावर उज्वला बेंडाळे यांच्या माध्यमातून महिलेस संधी देण्यात आलेली आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार