नदीत पाय घसरून पडल्याने युवकाचा मृत्यू, गावावर शोककळा

Spread the love

झुंजार एरंडोल प्रतिनिधी

एरंडोल :- गुरे चारण्यासाठी गेलेल्या 21 वर्षीय उच्चशिक्षित युवकांच्या नदीत पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना दुपारी तीन वाजेच्या सुमारास ढोली नदीत घडली. याबाबत माहिती अशी की ब्राह्मणे तालुका एरंडोल येथील योगेश मनोज पाटील वय 21 वर्षे हा आज सकाळी घरून गुरे चारण्यासाठी गेला होता. दुपारी तीन वाजेच्या सुमारास गुरे चारत असताना तो ढोली नदीवर गेला नदीकाठी असताना पाय घसरल्यामुळे तो नदीत पडला त्याला पोहता येत नसल्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला. गावातील ग्रामस्थांनी योगेश पाटील यास बाहेर काढून त्याचे एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तन्मय महाले यांनी त्यास तपासले असता तो मयत झाल्याचे सांगितले.

मयत योगेश पाटील हा अत्यंत हुशार होता तो एम एस सी च्या प्रथम वर्गात शिकत होता. योगेशचे वडील मनोज भीमराव पाटील शेतकरी असून त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे. योगेश पाटील हा परिवारातील मोठा मुलगा होता. योगेशा अत्यंत हुशार असल्यामुळे शिक्षण पूर्ण करून अधिकारी होण्याचे स्वप्न अपुरे राहिले याबाबत कासोदा पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. एरंडोल ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर तन्मय महाले यांनी मयत योगेश पाटील याचे शवविच्छेदन करून मयतास नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.

फोटो ओळी :- मयत योगेश पाटील

टीम झुंजार