आयुष्यात आईवडीलांची आज्ञा पाळा व आपले भविष्य ऊज्वल बनवा ! आ.सुरेश भोळे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

Spread the love

मेरीटमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न.

जळगांव:- छत्रपती शिवाजीराजे बहुऊद्देशिय संस्था जळगांव आयोजित हरदासराम मंगल कार्यालय येथे नायब शुभेदार शिवाजीराव शिंदे यांचा २६ वर्षानंतर सेवापुर्ती सोहळा व दहावी,बारावी,पदवी,एमपीएससी यात मेरीटमध्ये उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी अध्यक्षीय भाषणात आ.सुरेश भोळे मार्गदर्शन करतांना बोलत होते.कठोर शिस्तीचे आईवडीलांची वागणुक मुलांना वाईट वाटत असते मात्र त्या विद्यार्थ्याला इन्टरव्ह्युच्या वेळी आईवडीलांची कठोर शिस्तीची वागणुक कशी कामास येते व त्यामुळे ऊच्चपदावर कशी निवड होते हे उदाहरण देऊन पटवून दिले.

व सैनिक शिवाजीराव शिंदे यांचे देशसेवेच्या कार्याचा गौरव करुन त्यांचा अध्यक्षांचे शुभहस्ते सपत्निक स्मृतिचिन्ह शालश्रीफळसह पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला व सर्वांसाठी शिवशुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी प्रा.साहेबराव थोरात सर यांनी समायोचित मनोगत व्यक्त करतांना मुलांना मोबाईल पासुन फार लांब ठेवण्याचे आवाहन केले.सैनिक शिवाजीराव शिंदे यांनीही भारतमाताची सेवा करण्याची संधी मिळाले बद्दल धन्य झालेचे म्हटले व यशस्वी होणेसाठी परिश्रम महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

यावेळी एमपीएससी ऊत्तिर्ण विद्यार्थी मयुर मराठे याने मंडळाचे आभार मानले.कार्यक्रमाचे प्रास्तविक मंडळाचे अध्यक्ष विनोदभाऊ मराठे यांनी केले.यावेळी व्यासपिठावर मनपा आरोग्य सभापती जितेंद्रभाऊ मराठे,मराठा नवयुवक मंडळाचे अध्यक्ष संजयभाऊ मराठे,ऊपाध्यक्ष बाळूभाऊ मराठे,नियोजित छत्रपती शिवाजीराजे मराठा मंगल कार्यालयाचे अध्यक्ष विष्णुआप्पा बाळदे,छत्रपती शाहू मराठा मंडळ पाचोरा अध्यक्ष संजयबापु एरंडे ,सचिव भालसिंगे सर, संभाजीराव काळे,हभप नामदेव महाराज,डाॕ धनंजय बेंद्रे,राजेंद्र मोझे,दगडू सुधाकर मराठे, दगडूशेठ मोपारी,इंजि साहेबराव कांडेकर,सुभाषराव गुंजाळ,भिकाभाऊ तांदळे.

आदि मान्यवर ऊपस्थित होते.कार्यक्रमाचे सुरुवातीला दिपप्रज्वलनासह आराध्य दैवत छत्रपती शिवराय् , भारतमाता ,सरस्वती माता,महात्मा ज्योतिबा फुले यांचे प्रतिमांचे पुजन व शिववंदन करण्यात आले.आभार मंडळाचे सचिव रविंद्रभाऊ जगताप यांनी मानले,ऊत्कृष्ट सुत्रसंचालन मराठासेवा संघाचे महानगराध्यक्ष इंजि हिरामण चव्हाण यांनी केले.कार्यक्रमास मराठा समाजाचे सर्व क्षेत्रातील समाजबांधव माताभगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने ऊपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी होणेसाठी विनोद मराठे, विजय मराठे, रविंद्र जगताप, फकीरचंद जगताप, ज्ञानेश्वर गुंजाळ, जगन्नाथ मराठे, पिंटू मराठे गजानन जगताप, गणेश घुले, मनोज मराठे, ज्ञानेश्वर मराठे,बापू मराठे, गजानन जगताप, धनराज मराठे अमृत वाणी,संदीप मराठे, मोहन जगताप भैय्या वाणी, विकी वाघ, योगेश मराठे मंडळाचे सर्व पदाधिकारींनी परिश्रम घेतले.

हे पण वाचा

टीम झुंजार