जिल्हातील विविध पोलीस स्टेशनला दाखल गुन्हयातील चोरीस गेलेला व गहाळ झालेला ऐवज पोलीस दलाकडून मुळ मालकांना परत.

Spread the love

जळगाव :- जिल्ह्यात विविध पोलीस स्टेशनला गेल्या वर्षभरात घरफोडी, चोरी, जबरी चोरी, चैन स्न्याचींग, इत्यादी दाखल गुन्ह्यात चोरीस गेलेला सोन्या चांदीच्या वस्तू मोटार सायकल व गेल्या वर्षात मोबाइल गहाळ होण्याचे प्रमाण वाढलेले होते. त्या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक श्री एम. राज कुमार, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री चंद्रकांत गवळी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्था. गु. शाखा जळगाव श्री किसन नजन पाटील

व सर्व पो स्टे प्रभारी अधिकारी यांनी पथक तयार करून संबधित गुन्हयातील चोरीस गेलेल्या वस्तू व आरोपितांचा शोध घेवून आरोपी व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला तसेच गहाळ झालेले मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून मोबाईल चा शोध लावून ते हस्तगत करण्यात आले. सदर हस्तगत करण्यात आलेल्या वस्तू मूळ मालकांना परत करून त्यांचे आत्मिक समाधान व त्यांचा चेहऱ्यावर आनंद हाच पोलिसांचे बक्षीस आहे व त्यामुळे पोलिसांचे आत्मबल वाढावे व पुन्हा असेच काम करण्यासाठी प्रोत्साहित करावे या उद्देशाने

मा. पोलीस अधीक्षक श्री एम. राज कुमार, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री चंद्रकांत गवळी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे, पोलीस निरीक्षक स्था. गु. शाखा जळगाव श्री किसन नजनपाटील यांचे शुभहस्ते आज दि. २८/०७/२०२३ रोजी सदरचे दागिने, मोटार सायकल व १९१५ मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार