पिंपरी चिंचवड l प्रतिनिधी :- सतत पडणाऱ्या पावसाने सगळीकडे साथीचे आजार पसरवण्याची दाट शक्यता वाढली आहे त्यामुळे वेळेत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. डेंगू मलेरिया बाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी युवासंग्राम प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मयुर पवार यांनी आयुक्त शेखर सिंह साहेब यांना निवेदन दिले.
निवेदनातून अशी मागणी केली की पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेली आठ दिवसापासून जोरदार मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. नाले सफाईचा फार्स झाल्यामुळे अनेक ठिकाणी नाल्यांचे पाणी साचले आहे. ड्रेनेज लाईनचे घाण पाणी चोकअप होऊन ते बाहेर उघड्यावर येत आहे. तसेच काही भागांमध्ये टायर , जुनी प्लॅस्टिकची भांडी, कुंड्या आदि टाकाऊ वस्तूंमधून मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात डासांचा उपद्रव होत असून ताप येणे, थंडी वाजून येणे, अंग दुखणे, डोके दुखणे आदि साथींचे आजार तसेच डेंगू सारखे माणसांचा जीव घेणारे आजारी रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
धुराडे फवारणी (फॉमिंग) औषध फवारणी, डब्यात ऑइल टाकणे, गप्पी मासे सोडणे आदी उपायोजना करताना महापालिका दिसत नाही. त्यामुळे या पुढच्या काळात डेंगू,मलेरिया, स्वाईन फ्लू या आजारांचा फैलाव शहरात अधिक वेगाने होऊ शकतो. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून व्यापक जनजागृती व योग्य त्या उपाययोजना राबवल्यास या शहरातील अनेक सामान्य नागरिकांचे प्राण वाचू शकतात. तरी या तक्रारीची योग्य दखल घेऊन संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना तातडीच्या सूचना देऊन योग्य त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात .
हे पण वाचा
- VIDEO: कुटुंबानं खरंच यमराजाला दिला चकवा!काच फोडून कारमध्ये शिरल्या लोखंडी सळ्या; पहा नशीब अन् कर्मावर विश्वास बसणार नाही असा व्हिडिओ.
- नवरदेव आला मंडपात, इतक्यात नवरीचा वडिलांनी तिच्या मृत्यूची बातमी सांगितली,नवरदेवाला आला संशय अन् हादरवणारे सत्य आलं समोर.
- बाबागिरी करणाऱ्या मौलवीने 17 वर्षीय निष्पाप मुलाची निर्घुण हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून दुकानात पुरले,साडे चार वर्षानी गुढ उकललं.
- दोन मुलांची आई प्रियकराच्या प्रेमात आंधळी, पत्नीने प्रियकराला बोलवले घरी दोघांना सोबत पाहून पतीची तळपायाची आग मस्तकात गेली, मग पुढे सुरू झाला हायहोल्टेज ड्रामा.
- पती खूनाच्या आरोपात अटकेत त्याला वाचवण्याच्या नादात पत्नीनं भलतचं केलं, पोलिसांवर केलेल्या गंभीर आरोपात तीन पोलिस निलंबित,काय आहे प्रकरण.