प्रतिनिधी | अमळनेर
अमळनेर तालुक्यातील नंदगाव येथे दिनांक २८ रोजी दुपारच्या सुमारास १९ वर्षीय तरुणाने राहत्या घरी दोरीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.आईवडील शेतात गेल्यावर योगेशने टोकाचे पाऊल उचलून जीवन संपविले असून आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून याप्रकरणी अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील नंदगाव येथील गोकुळ रघुनाथ पाटील व त्यांच्या पत्नी सिमाबाई हे नेहमीप्रमाणे काल २८ रोजी शेतात गेले होते. व त्यांचा मुलगा योगेश गोकुळ पाटील (वय १९) हा एकटाच घरी होता. दुपारी तीन वाजता गोकुळ पाटील हे शेतात फवारणी करून परत आले आले व गावातील सुकदेव पाटील यांच्या गोठ्यात फवारणीचा पंप ठेवण्यासाठी गेले असता त्यांना योगेशने सुती दोरीच्या सहाय्याने लोखंडी अँगलला गळफास घेतल्याचे दिसून आले. ते दृश्य पाहून त्यांनी हंबरडा फोडल्याने शेजारी पाजारी राहणारे लोक गोळा झाले.
त्यांनी योगेशला खाली उतरवत खाजगी वाहनाने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी अमळनेर पोलिसांत उशिरा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय वना पाटील हे करीत आहेत. योगेश पाटील याने आत्महत्या कोणत्या कारणांमुळे केली असेल त्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही , योगेशच्या आत्महत्येमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हे पण वाचा
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.