जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
दिवस मनाप्रमाणे घालवाल. जवळच्या मित्रांची गाठ पडेल. सामाजिक जाणीव ठेवून वागाल. एखादे जुने स्वप्न पूर्ण होईल. सकारात्मक विचारातून यशस्वी व्हाल.
वृषभ :-
मित्रांची बाजू जाणून घ्यावी. मानसिक चंचलता जाणवेल. समतोल विचार करून पहावा. जोडीदाराकडून सहकार्याची अपेक्षा ठेवाल. अति चिकित्सा करू नका.
मिथुन :-
काही गोष्टींचे चिंतन करावे लागेल. व्यापार्यांना चांगला लाभ होईल. सामाजिक प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. प्रगतीचा मार्ग खुला होईल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील.
कर्क :-
मोहाला बळी पडू नका. जोडीदाराविषयी मनात शंका बाळगू नका. गोड बोलून कामे करून घ्यावीत. मुलांना जबाबदारीची जाणीव करून द्यावी. कामाचा वेग वाढेल.
सिंह :-
आज आशादायक ग्रहमान राहील. कामाचा जास्त बोजा घेऊ नका. वरिष्ठांची कौतुकाची थाप पडेल. दिनक्रम व्यस्त राहील. हाती घेतलेले काम तडीस न्याल.
कन्या :-
व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध होईल. काही कामे कमी श्रमात पार पडतील. जोडीदार तुमच्यावर नाराज होऊ शकतो. रेस-जुगारातून लाभ संभवतो. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल.
तूळ :-
अति उत्साहावर नियंत्रण ठेवा. भागीदाराशी सुयोग्य चर्चा कराल. अनोळखी व्यक्तींशी संपर्क टाळा. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. विरोधकांचा रोष मावळेल.
वृश्चिक :-
आज आराम करण्याची इच्छा निर्माण होईल. प्रिय व्यक्तीची नाराजी दूर होईल. जुन्या गुंतवणुकीतून लाभ होईल. कामातून समाधान लाभेल. नसती काळजी करू नका.
धनू :-
दिवस प्रसन्नतेत उगवेल. काही जुने प्रश्न मार्गी लागतील. कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. मुलांबरोबर अधिक वेळ घालवाल. छंद जोपासण्यासाठी वेळ काढा.
मकर :-
व्यायामात आळस करू नका. घरातील वातावरण खेळते राहील. दिवस मजेत जाईल. जोडीदाराच्या उत्पन्नात वाढ होईल. घरात तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल.
कुंभ :-
ग्रहमानाची अनुकूलता लाभेल. भावंडांची मदत मिळेल. कोणालाही दुरूत्तर करू नका. मानसिक चंचलता टाळावी. प्रेमसंबंध घट्ट करण्याचा प्रयत्न करावा.
मीन :-
नवीन संकल्पना कृतीत उतरवा. कौटुंबिक कामात वेळ जाईल. बागकामाची आवड जोपासाल. उतावीळपणा करू नये. मित्र मंडळींचे सहकार्य घ्याल.
हेही वाचलंत का ?
- VIDEO: कुटुंबानं खरंच यमराजाला दिला चकवा!काच फोडून कारमध्ये शिरल्या लोखंडी सळ्या; पहा नशीब अन् कर्मावर विश्वास बसणार नाही असा व्हिडिओ.
- नवरदेव आला मंडपात, इतक्यात नवरीचा वडिलांनी तिच्या मृत्यूची बातमी सांगितली,नवरदेवाला आला संशय अन् हादरवणारे सत्य आलं समोर.
- बाबागिरी करणाऱ्या मौलवीने 17 वर्षीय निष्पाप मुलाची निर्घुण हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून दुकानात पुरले,साडे चार वर्षानी गुढ उकललं.
- दोन मुलांची आई प्रियकराच्या प्रेमात आंधळी, पत्नीने प्रियकराला बोलवले घरी दोघांना सोबत पाहून पतीची तळपायाची आग मस्तकात गेली, मग पुढे सुरू झाला हायहोल्टेज ड्रामा.
- पती खूनाच्या आरोपात अटकेत त्याला वाचवण्याच्या नादात पत्नीनं भलतचं केलं, पोलिसांवर केलेल्या गंभीर आरोपात तीन पोलिस निलंबित,काय आहे प्रकरण.