जळगाव, दि.१ ऑगस्ट (जिमाका)- यावल अवैध फर्निचर दुकानांवर आज यावल वन विभागाने कारवाई केली. यात सुमारे १ लाख रूपये किंमतीची वन लाकुड व मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल गावातील शेख असलम शेख असगर (मुन्शी फर्निचर) येथे वन कर्मचार्यांना सह सापळा रचून धाड सत्र राबवले. त्यात विना परवाना अवैध साग नग – 5 (घन मीटर 0.062) तसेच रंधा मशीन – 1 असा एकूण 21984 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
किनगाव येथील रामचंद्र पाटील यांचे अवैध फर्निचर दुकानवर सापळा रचून धाड टाकली असता त्यात दरवाजा फालके 08, पलंग 02, सोफा सेट 01, साग नग 72, चौरंग 04, तसेच लाकूड कट्टर मशीन 01, असा एकूण 75,000 रूपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला.
मुख्य वनसरंक्षक ऋषिकेश रंजन यांच्या मार्गदर्शनाखाली यावल उपवनसंरक्षक जमीर शेख, यावल पूर्व वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे,यावल पूर्व वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे यांच्या नेतृत्वाखाली वनपाल रविंद्र तायडे, वनपाल राजेंद्र ख़र्चे, वनरक्षक भैय्यासाहेब गायकवाड, अनिल पाटील, वाहन चालक सुनील पाटील यांनी संयुक्तरित्या कार्यवाही केली.
पुढील तपास वनपाल डोंगर कठोरा, वनपाल वाघझिरा हे करीत आहेत.
हे पण वाचा
- Viral Video: दोन दरोडेखोर पिस्तुलाचा धाक दाखवून दागिने लुटणार इतक्यात दुकानदार व कर्मचाऱ्यांनी अस केलं की चोरांचा डाव उलटवला.
- पोलखोल! बनावट एडिशनल एसपी बनून आली पोलीस ठाण्यात पोलिसांनी केलं सॅल्यूट;पण एक छोटीशी चूक होताच पोलिसांनी केला महिलेचा पर्दाफाश.
- एरंडोल येथे संविधान दिवस उत्साहात संपन्न; “घर घर संविधान” चळवळ यशस्वी करण्याचा संकल्प
- धक्कादायक! आईने घरातील पत्र्याला घेतला गळफास,तर दोन चिमुकली आढळली पाण्याच्या बॅरेलमध्ये,कारण अस्पष्ट.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४