रोजच्या आहारात तुम्ही दोनच स्ट्रॉबेरींचा समावेश केला तर, तुमचं हृदयाचं आणि मेंदूचं आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल. कसं ते जाणून घ्या.
Strawberries Health Benefits For Brain And Heart : आरोग्य सुदृढ आणि निरोगी ठेवण्यासाठी आपण नेहमीच आहारात गुणकारी फळांचा समावेश करतो. परंतु, लाल रंगाची स्ट्रॉबेरी आहारात नसेल, तर त्यापासून होणाऱ्या फायद्यांचा आपल्याला लाभ मिळत नाही. लालभडक रंगाची स्ट्रॉबेरी पाहिली की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. काही लोक याला अपवाद असतील. मात्र, इतर फळांच्या तुलनेत स्ट्रॉबेरीची चव खूपच चांगली असते, असं तज्ज्ञ सांगतात. रोजच्या आहारात तुम्ही दोनच स्ट्रॉबेरींचा समावेश केला तर, तुमचं हृदयाचं आणि मेंदूचं आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल.
स्ट्रॉबेरीचं सेवन केल्यावर हृदय आणि मेंदू सक्रिय राहून आरोग्य उत्तम राहतं. कारण , स्ट्रॉबेरीत मोठ्या प्रमाणात ज्यूसी बेरीज, न्यूट्रिशन्स आणि अॅंटिऑक्सिडन्ट्सचा समावेश असतो. तसंच हृदयातील रक्तवाहिन्या निरोगी राहण्यासही मदत मिळते. अपोलो रुग्णालयातील चिफ न्यूट्रिशनिस्ट डॉ. प्रियंका रोहतगी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन स्ट्रॉबेरीच्या सेवनामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहतं. शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहून त्या व्यक्तीची अॅंटिऑक्सिडन्टची क्षमता वाढते.
स्ट्रॉबेरीचं सेवन केल्यावर शरीराला कोणते फायदे मिळतात?
हृदयाचं आरोग्य निरोगी राहण्यासाठी रक्तप्रवाह नियमितपणे सुरु राहणे अत्यंत महत्वाचं असतं. हाय ब्लड प्रेशर (Hypertension) हृदय विकाराचा झटका येण्याचं मुख्य कारण आहे. स्ट्रॉबेरीमध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असतं. त्यामुळे रक्तवाहिन्यांचं कार्य उत्तम राहतं आणि मानसिक ताणतणाव कमी होऊन हृदय सक्रीय राहण्यास मदत मिळते. शरीरात असलेलं एलडीएल कोलेस्ट्रॉल (LDL Cholesterol) नियंत्रणात राहतं. त्यामुळे हृदय रोगाचा धोका निर्माण होत नाही.
स्ट्रॉबेरीत असेलेले डाएटरी फायबर आणि अॅंटिऑक्सिडन्ट्समुळे हेल्थी कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतं. त्यामुळे हृदयाचं आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते, असं एका ब्रिटिश जनरल न्यूट्रिशनच्या सर्वेक्षणात म्हटलं आहे. स्ट्रॉबेरीमध्ये अॅंथोसायनिन्स, फ्लेवोनॉईड्स आणि पॉलिफीनोल्स प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने शरीराला अॅंटिऑक्सिडन्ट्स मिळतं. त्यामुळे एंडोथेलियल डायफंक्नश आणि (endothelial dysfunction) आणि ॲथरॉसक्लेरोसिस धोका निर्माण होत नाही.
हृदय सक्रीय राहण्यासाठी नियमितपणे ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन्सची अत्यंत आवश्यकता असते. स्ट्रॉबेरीमध्ये ‘क’ जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असतं. ज्याचा फायदा शरीरातील लोहाची व्यग्रता वाढण्यात होतो आणि सेरोटोनीन आणि डोपामाईनसारख्या न्यूरोट्रान्समिटर्सचं प्रोडक्शन वाढवण्यासही मदत होते.
हे वाचलंत का ?
- VIDEO: कुटुंबानं खरंच यमराजाला दिला चकवा!काच फोडून कारमध्ये शिरल्या लोखंडी सळ्या; पहा नशीब अन् कर्मावर विश्वास बसणार नाही असा व्हिडिओ.
- नवरदेव आला मंडपात, इतक्यात नवरीचा वडिलांनी तिच्या मृत्यूची बातमी सांगितली,नवरदेवाला आला संशय अन् हादरवणारे सत्य आलं समोर.
- बाबागिरी करणाऱ्या मौलवीने 17 वर्षीय निष्पाप मुलाची निर्घुण हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून दुकानात पुरले,साडे चार वर्षानी गुढ उकललं.
- दोन मुलांची आई प्रियकराच्या प्रेमात आंधळी, पत्नीने प्रियकराला बोलवले घरी दोघांना सोबत पाहून पतीची तळपायाची आग मस्तकात गेली, मग पुढे सुरू झाला हायहोल्टेज ड्रामा.
- पती खूनाच्या आरोपात अटकेत त्याला वाचवण्याच्या नादात पत्नीनं भलतचं केलं, पोलिसांवर केलेल्या गंभीर आरोपात तीन पोलिस निलंबित,काय आहे प्रकरण.