एरंडोल l प्रतिनिधी
एरंडोल- सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संघाचे उपक्रम सर्वाना प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन आमदार चिमणराव पाटील यांनी केले.सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात संचाच्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते.माजी उपनगराध्यक्ष सुरेश जाखेटे अध्यक्षस्थानी होते.प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड,बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,शिवसेनेचे
शहरप्रमुख आनंदा चौधरी (भगत) प्रमुख पाहुणे होते.
यावेळी आमदार चिमणराव पाटील,प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांचेसह उपस्थित मान्यवरांच्या
हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला.यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी ज्येष्ठ नागरिक संघाच्या उपक्रमांचा गौरव करून सत्कारामुळे विद्यार्थ्याना प्रेरणा मिळून त्यांच्यातील आत्मविश्वास वाढत असल्याचे सांगितले.पालकांनी शिक्षणासाठी मुलांवर दबाव न टाकता त्यांच्या आवडीनुसार शिक्षण घेवू द्यावे असे आवाहन केले.ज्येष्ठ नागरिकांनी परिवाराचे आणि समाजाचे मार्गदर्शक म्हणून काम करावे असे सांगितले.
प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांनी आजोबांच्या उपस्थितीत नातवाचा सत्कार होणे हा महत्वाचा क्षण असल्याचे सांगितले. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,प्रा.शिवाजीराव गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष तथा निवृत्त तहसीलदार अरुण माळी यांनी प्रास्ताविक केले.संघाचे सचिव विनायक कुलकर्णी यांनी सुत्रसंचलन केले.
उपाध्यक्ष जाधवराव जगताप यांनी आभार मानले. यावेळी संघाच्या सभासदांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.आमदार चिमणराव पाटील यांचेसह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.नामदेवराव पाटील यांनी यावेळी प्रार्थना सादरकेली.कार्यक्रमास उपाध्यक्ष जाधवराव जगताप,संचालक विश्वनाथ पाटील,वसंतराव
पाटील,गणेश पाटील,भगवान महाजन,निंबा बडगुजर, जगन महाजन,पी.जी.चौधरी,सुपडू शिंपी,नामदेव पाटील, सुरेश देशमुख यांचेसह सभासद,गुणवंत विद्यार्थी,पालक
उपस्थित होते.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
हे पण वाचा
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.






